अतिक्रमण धारकांवर नगरपरिषदेचा हातोडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिक्रमण धारकांवर नगरपरिषदेचा हातोडा

जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली

हिंगोली प्रतिनिधी- रिसाला बाजार गणेशवाडी येथील हनुमान मंदिर ते स्मशानभूमी या रस्त्याकरिता मान्यता मिळाली , फंड ही मिळाला ,आमदार व नगराध्यक्ष यांच्या

जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप
पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात
स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजक तयार होतील : बापुसाहेब पुजारी

हिंगोली प्रतिनिधी– रिसाला बाजार गणेशवाडी येथील हनुमान मंदिर ते स्मशानभूमी या रस्त्याकरिता मान्यता मिळाली , फंड ही मिळाला ,आमदार व नगराध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन करून नारळही फोडण्यात आले . मात्र ज्या ठिकाणी रस्ता होणार होता त्या ठिकाणी अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केले होते . त्यांना प्रशासनाच्या वतीने नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या.  तरीसुद्धा अतिक्रमण हटले नाही.  नाईलाजाने नगरपरिषदेने शेवटी पोलिसांच्या मदतीने व जेसीबीच्या साह्याने  अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली  हि कारवाईत करण्याकरिता  नगरपरिषदेचे मुख्यधिकारी अरविंद मुंडे, नगर अभियंता रत्नाकर अडसरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर आदीं नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS