Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे फरार

8 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी छापे ; राहते घर केले सील

अहमदनगर ः बांधकाम परवाना देण्यासाठी तब्बल 8 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुरूवारी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर जालना येथील ल

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ३० अर्ज वैध
बाल संस्कार शिबीर बदलत्या काळाची गरज ः महंत उद्धव महाराज
जुन्या पेन्शनसाठी संपकरी कर्मचार्‍यांनी केली निदर्शने

अहमदनगर ः बांधकाम परवाना देण्यासाठी तब्बल 8 लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुरूवारी महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने कारवाई केली. मात्र कारवाईची चाहूल लागतात डॉ. जावळे फरार झाले असून, एसीबीने त्यांचे राहते घर सील केले आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, बांधकाम परवानगी देण्यासाठी आयुक्त डॉ. जावळे (वय-47 वर्षे) आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर (मूळ रा.माजलगाव जि.बीड) यांनी 8 लाखांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे जावळे यांनी आपल्या कार्यालयातील लिपिक श्रीधर देशपांडे (वय-48 वर्षे) पद- लिपिक टंकलेखक  अतिरिक्ङ्क्षत पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका, अहमदनगर यांच्यामार्फत 9 लाख 30 हजाराची मागणी केली होती, अखेर तडजोडी अंती 8 लाख रूपये लाच देण्याचे ठरले होते. एता कन्स्ट्रक्शन फर्मच्या बांधकामासाठी हा परवाना पाहिजे होता. 19 आणि 20 जून रोजी ही रक्कम अहमदनगर पालिका लिपिक देशपांडे यांच्यामार्फत ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीकडे तक्रार गेल्यानंतर एसीबीने कारवाई सुरू केली. एसीबीच्या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर पालिका आयुक्त आणि लिपिक हे दोघेही सध्या फरार झाले आहेत. एसीबीच्या वतीने आयुक्तांचे राहते घर सील करण्यात आले आहे.  या प्रकरणात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर आणि जालना एसीबीच्या पथकाने केली आहे. सापळा अधिकारी किरण बिडवे, पोलिस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना, सहाय्यक सापळा अधिकारी शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना, सापळा पथक पोलिस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर, अँटी करप्शन ब्युरो, जालना यांच्या पथकाने केली आहे.

आयुक्तांच्या घरावर छापा – अहमदनगर मनपा आयुक्तांनीच लाच मागितल्याचा आरोप झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एसीबीच्या पथकाने आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानी छापा टाकत तपासणी करत त्यांचे राहते घर सील केले आहे. सोबतच दुसरा संशयित आरोपी देशपांडेच्या बुर्‍हानगर येथील घरी देखील छापा टाकला आहे. 

COMMENTS