मुंबई ः मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळा अंतर्गत येणार्या मध्य मुंबई विभागातील कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी या विभागातील उपविभागीय अभियंता
मुंबई ः मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळा अंतर्गत येणार्या मध्य मुंबई विभागातील कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी या विभागातील उपविभागीय अभियंता यांना हाताशी धरून चांगलाच आर्थिक धुडगूस घातला असून, बोगस देयके देण्याचा सपाटाच लावला आहे. ठेकेदारांशी संगनमनत करून त्यांच्याकडून 30 टक्क्यांच्या रूपात लाचेची मागणी करत बोगस देयके अदा करून कोट्यावधींचा आर्थिक मालमत्ता करण्याचा धडाकाच कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी लावला आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, वरळी-1 चे उपअभियंता, पन्हाड उपअभियंता, वरळी बांधकामचे उपअभियंता, दादर उपविभाग उपअभियंता बापट, हाफकिन उपविभागाचे दिलीप हिंगे, बीडीडी चाळ उपविभागाचे अधीक्षक आंबवडे या सर्व अधिकारी, कर्मचार्यांना हाताशी धरून कार्यकारी अभियंता यांनी बोगस कामांना अधिकृत मान्यता देत त्यांची बोगस देयके अदा करण्याचा सपाटा लावला असून, यामध्ये कोट्यांवधींचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. पन्हाड आणि वरळी पोलिस कॉलनी, दादर पोलिस कॉलनी, धर्मादाय आयुक्त कार्यालय, बीडीडी चाळ, हाफकिन इन्स्टिटयूट, पोदार हॉस्पिटल, शिवाजी पार्क मैदान आदी ठिकाणी देखभाल दुरूस्ती व विशेष दुरूस्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला आहे.
मोजमाप पुस्तिकेमध्ये बोगस नोंदी आणि बोग टेंडर – मध्य मुंबई विभागातील कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांच्या अंतर्गत विविध ठिकाणी शाखा अभियंत्यांना हाताशी धरून ज्या शाखा अभियंत्यांच्या अंतर्गत ही कामे करण्यात आली, त्या शाखा अभियंत्यांनी कुठल्याही प्रकारे स्वहस्ताक्षरात नोंदी केलेल्या नाहीत. सदर मोजमाप पुस्तिकेच्या लेखनिकाच्यामार्फत नोंदी करून देयके सादर करण्यात आलेली आहेत. या संपूर्ण प्रकरणात बोगस नोंदी आणि बोगस टेंडर काढून देयके अदा करण्यात आली आहेत. बनावट अंदाजपत्रके सादर करून, बोगस कामे करून, कामे केल्याचे भासवण्यात आले आहे. तसेच टेस्ट रिपोर्ट बोगस आणि काम केल्याचे बनावट फोटो सादर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील यांनी महत्वाची भूमिका निभावली असून, त्यामध्ये कोट्यावधींचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे.
30 टक्के लाच घेत काढले देयके – कार्यकारी अभियंता यांनी या विभागात काढलेले देयके हे बोगस कामांची देयके असून, यापोटी त्यांनी संबंधित ठेकेदारांना हाताशी धरून तब्बल 30 टक्के लाच घेत बोगस देयके काढण्यात आली आहेत. त्यामुळे महेंद्र पाटील यांची चौकशी होण्याची मागणी जोर धरतांना दिसून येत आहे. महेंद्र पाटील यांनी काढण्यात आलेल्या देयकांची चौकशी होवून, बोगस कामांचे ऑडिट होण्याची गरज आहे.
चौकशी न झाल्यास दाखल करणार जनहित याचिका – मुंबई मध्ये विभागातील भ्रष्टाचाराचा आलेख सतत उंचावणारा असून, या विभागात बोगस देयकांची चौकशी केल्यास कोट्यावधींचा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य सचिव, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या संपूर्ण प्रकरण गंभीरतेने घेवून चौकशी करावी अन्यथा या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
COMMENTS