Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरसरीच्या 73 टक्के पाऊस

मुंबई : मुंबईत ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिली आहे. तर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सातही धरणातील पाणीसाठा 8

दैनिक लोकमंथन l बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचे फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत
राष्ट्रवादीचे खासदारफैजल पुन्हा अडचणीत
अपघातग्रस्तांच्या मदतीला गेलेल्यांचाच अपघाती मृत्यू

मुंबई : मुंबईत ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिली आहे. तर धरणक्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सातही धरणातील पाणीसाठा 83 टक्क्यांवर स्थिरावला आहे. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरसरीच्या 73 टक्के पाऊस पडला आहे. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. मात्र तरीही धरणातील पाणीसाठा वाढतो का याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.
पाणीसाठ्यात अद्याप 15 ते 17 टक्के तूट आहे. पावसाचे दीड, दोन महिने शिल्लक असले तरी पाणीसाठ्यात तूट राहू नये याकरीता जलअभियंता विभागही धरणातील पाणी पातळीवर नजर ठेवून आहे. मुंबई महानगरात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 73.76 टक्के पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी यावेळी 70 टक्के पाऊस पडला होता. दरवर्षी मुंबईत अडीच हजार मिमी पाऊस पडतो. जूनपासून आतापर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर 1792 मिमी पावासची नोंद झाली, तर सांताक्रूझ केंद्रावर 2354 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात मात्र गेल्यावर्षीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा अद्याप कमी आहे. सातही धरणात मिळून सध्या 12लाख 8हजार 624 दशलक्ष लिटर म्हणजेच 83.51 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला दररोज 1,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठे भातसा धरण अजून काठोकाठ भरलेला नाही. 2022 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भातसा धरणात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा होता. मात्र यावेळी या धरणातील पाणीसाठा 78 टक्के इतका आहे.

COMMENTS