लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये कला शाखेत द्वितीय वर्षासाठी शिकत असलेल्या पायल इंद्रजीत जाधव या विद्या
लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयामध्ये कला शाखेत द्वितीय वर्षासाठी शिकत असलेल्या पायल इंद्रजीत जाधव या विद्यार्थिनीने जयपूर राजस्थान येथे राजस्थान युन्हिर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या 57 किलो वजन गटातील तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण असेच यश मिळविलेले आहे. या स्पर्धा 12, 13 व 14 मार्च रोजी झाल्या. यामध्ये तिने दोन सुवर्ण पदक प्राप्त केलेली आहेत. या यशाबद्दल पायल जाधव हिचे अभिनंदन होत आहे. पायल हिने तयकावांडोच्या अंतर्गत पुमसे व क्युरोगी या दोन प्रकारात तिचा सहभाग नोंदवला होता आणि घवघवीत यश संपादन केले. पूमसे आणि क्युरोगी मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. पायलच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांच्यासह शालेय प्रशासन, तिचे कुटुंबिय व नागरिकांनी अभिनंदन केलेले आहे. पायलला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय म्हस्के व रणजित झा (आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे) यांचे मार्गदर्शन लाभले.
या अगोदरच काही दिवसांपूर्वी पायल जाधव हिने चंदीगड येथे झालेल्या इंडो नेपाळ इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. आज पुन्हा एकदा गुलाबी शहराच्या गुलाबी मातीत पायल हिने यशाला गवसणी घातली आहे. राजस्थान युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी युवा खेळ परिषद भारतचे संचालक अमरसिंग चंदेले व आर्यन पाठक, पालक हेमलता सावंत (मावशी), स्पर्धेसाठी लाभलेले पंच, सर्व विजेते उपविजेता उपस्थित होते. ही स्पर्धा युवा खेळ परिषद भारतच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पायल हिने मागच्या महिन्यापासून नव्याने तयारी सुरू केली होती. येत्या 24, 25 व 26 एप्रिल रोजी आंतर राज्य स्पर्धा होणार असून या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे पायल हिने सांगितले.
COMMENTS