Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कृष्णा’च्या आईसाहेब श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले यांचे निधन

कराड / प्रतिनिधी : सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा

मुंबईतील दहशतवादाचा कट उधळला
शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; ‘असे’ होणार मदतीचे वाटप
स्वर्ण डरांगे बारावीत सर्वप्रथम तर गणितात जिल्हयात प्रथम

कराड / प्रतिनिधी : सहकार, सामाजिक, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेले सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या पत्नी आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मातोश्री श्रीमती जयमाला जयवंतराव भोसले (वय 89) यांचे सोमवार, दि. 1 रोजी रात्री 11.45 वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कृष्णा परिवाराच्या ‘आईसाहेब’ हरपल्या असून, कृष्णा काठच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मंगळवार, दि. 2 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास केसीटी कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हापूरातील कर्नल नानासाहेब दत्ताजीराव इंगळे यांच्या कन्या असलेल्या जयमाला यांचा जन्म 13 डिसेंबर 1932 रोजी झाला. हायर सेकंडरीपर्यंत शिक्षण घेतल्यावर 19 मे 1952 रोजी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर जयमाला भोसले (आईसाहेब) यांनी आप्पासाहेबांच्या प्रत्येक कार्याला पाठबळ देत, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पेलली. या भागात समृध्दी नांदावी यासाठी आप्पासाहेब कृष्णा कारखान्यासह अन्य सहकारी संस्थांच्या उभारणीत तसेच सार्वजनिक कार्यात सतत व्यस्त असत. अशावेळी एक गृहिणी म्हणून कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्यांनी पेलली. कौटुंबिक जबाबदारी जपताना आपल्या 2 मुलांचे आणि 2 मुलींचे संगोपन व पालन पोषण केले. याचवेळी त्यांनी आप्पासाहेबांच्या शैक्षणिक कार्यात सक्रीय सहभाग घेत, शैक्षणिक कामामध्ये प्रत्यक्ष योगदान दिले. कृष्णा हॉस्पिटलसह कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूल, कृष्णा विद्यापीठ या संस्थांच्या वाटचालीत कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्‍वस्त या नात्याने त्यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे. किंबहुना आप्पासाहेबांच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाबरोबरच आप्पासाहेबांवर प्रेम करणार्‍या कृष्णाकाठच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला मायेची सावली दिली.
श्रीमती जयमाला भोसले (आईसाहेब) गेले काही दिवस आजारी होत्या. सोमवारी (ता. 1) रात्री 11.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कृष्णा परिवाराच्या ‘आईसाहेब’ हरपल्या असून, कृष्णाकाठच्या परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर मंगळवारी (ता. 2) दुपारी 12 च्या सुमारास केसीटी कृष्णा स्कूलच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा डॉ. सुरेश भोसले, पृथ्वीराज भोसले, मुलगी सौ. उज्वला घाटगे, पद्मजा शिर्के, सून सौ. उत्तरा भोसले, सौ. वसुंधरा भोसले, जावई राजेंद्रसिंह घाटगे, नातू डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, डॉ. जयवर्धन भोसले, नातसून सौ. गौरवी भोसले असा मोठा परिवार आहे.

COMMENTS