Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ.सौ. नमिताताई मुंदडा व मान्यवरांच्या हस्ते केज नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

हारुणभाई इनामदार यांच्या अंगी कसरत व कला अवगत आहे-रमेशराव आडसकर

केज प्रतिनिधी - दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी केज नगरपंचायत येथे केज नगरपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचा भव्य उद्घाटन सोहळा आमदार सौ. नमिताताई मु

बाळ बोठेने फोन केलेले वकील चौकशीच्या रडारवर
मनमोहन माहिमकर कामाच्या शोधात
कोरोना वॅक्सिन घेताना हार्ट अटॅक आला… आणि सुपरस्टार ‘स्टार’ झाला |’Filmi Masala’| LokNews24

केज प्रतिनिधी – दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी केज नगरपंचायत येथे केज नगरपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचा भव्य उद्घाटन सोहळा आमदार सौ. नमिताताई मुंदडा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न  केज नगरपंचायतच्या माध्यमातून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई आणि केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे व आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांच्या सहकार्याने व त्यांच्या पाठपुराव्यामुळे 500 लक्ष रु. निधी केज नगरपंचायतला विविध विकास कामासाठी दिला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सौ. नमिता ताई मुंदडा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेश रावजी आडसकर प्रमुख उपस्थिती भाजपचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा, जनविकास आघाडीचे मार्गदर्शक अंकुशराव इंगळे, जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सिताताई बनसोड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या पाटील, माजी जि. प. सदस्य विजयकांत मुंडे, शिवसेना तालुका अध्यक्ष रत्नाकर आप्पा शिंदे, आर. पी. आयचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीपराव गुळभिले, स्त्री रोग तज्ञ डॉ. त्रिंबकराव चाटे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते नसीरभाई इनामदार, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, भाजपचे डॉ. वासुदेव नेहरकर, भाजपचे युवा नेते राहुल भैया गदळे, सुनील घोळवे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केशव कदम, शिवसंग्रामचे किसन कदम, हिंगोली व नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख सौ. रत्नमालाताई मुंडे, ज्येष्ठ खेळाडू विनोद गुंड, जनविकास परिवर्तन आघाडीचे गटनेते राजूभाई इनामदार, माजी सरपंच युवराज दादा काळे, रोटरीचे माजी अध्यक्ष मिरगणे आप्पा, यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून विविध विकास कामाचे उद्घाटन आमदार सौ. नमिताताई मुंदडा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्षय भैया मुंडे यांनी सांगितले की, केज शहराच्या विकासासाठी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही व केज शहराचा विकास मोठ्या प्रमाणात केला जाईल असे आश्वासन दिले आहे. आमदार सौ. नमिताताई मुंदडा म्हटल्या की,केज मतदार संघातील सर्व कामे क्वालिटीची झाली पाहिजेत मी स्वतः त्या कामावर लक्ष देऊन कामे करून घेणार आहे. त्याचबरोबर सदरील गुतेदारांनी कामे क्वालिटीची करावीत असा इशारा देखील दिला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप रमेशराव आडसकर यांनी केला. पुढे बोलताना रमेश राव आडसकर म्हणाले की, हारूनभाई इनामदार यांच्या अंगी कसरत व कला आहे त्याचबरोबर केजच्या विकास कामासाठी आमच्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे करू केज नगरपंचायत च्या सदस्या यांचे पती पप्पू अण्णा इनामदार आज रोजी आपल्यात हयात नाहीत आजत्याची कमी जाणवते असे नमूद केले.  यावेळी उपस्थित मान्यवर व केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी महेश गायकवाड, जनविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व नगरसेवक, केज नगरपंचायतचे कर्मचारी, जनविकास बांधकाम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर बांधकाम मजूर, शहरातील विविध बचत गटाच्या महिला आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई यांनी केले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी मानले.

COMMENTS