आष्टी प्रतिनिधी - ’लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, हिंदुस्थानचे लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांचे बुद्धीकौशल्य प
आष्टी प्रतिनिधी – ’लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, हिंदुस्थानचे लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांचे बुद्धीकौशल्य प्रचंड लोकप्रियता आणि सर्वांना सोबत घेण्याची वेगळे हातोटी सर्वोत्कृष्ट होती असे सांगून स्व. गोपीनाथरावांनी महात्मा फुले समता परिषदेसाठी सदैव योगदान दिले एवढेच नाही तर ते सोबत राहून त्यांनी साथ ही दिली..!’ अशा शब्दात आपल्या अभिष्टचिंतन दिनी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याच्यावतीने समता परिषदेच्या माध्यमातून लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांचा एकमेकांना आलिंगन देतानाची भगवानगडावरील भव्य प्रतिमा भेट दिली. त्यावेळी आपल्या गहिवरल्या स्वरात ना. भुजबळ यांनी गोपीनाथरावजी मुंडे यांचे कौतुक करत मोठेपणा पुन्हा अधोरेखित केला.
निमित्त होते ना. छगन भुजबळ यांच्या अभिष्टचिंतन दिनाचे. राज्यभरातून ना. भुजबळांना अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने सत्कार शुभेच्छा आणि दीर्घायुष्यासाठी गाव वाड्या आणि जिल्हा, विभाग ,राज्य आणि देशभरातून प्रार्थना करण्यात आल्या.दरम्यान आष्टी तालुका समता परिषदेच्यावतीने ना.छगनराव भुजबळ यांना आज शुभेच्छा देऊन प्रत्यक्ष भव्य प्रतिमा प्रदान करण्यात आली त्यावेळी हा प्रसंग अनुभवास आला.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या 76 व्या. वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आष्टी तालुक्याच्यावतीने त्यांना संत भगवानबाबा यांंच्या भगवानगडावरील लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि ना.छगन भुजबळ यांची गळाभेट असलेली प्रतिम सस्नेह भेट देऊन सत्कार केला.यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे ,पदाधिकारी, समता सैनिक उपस्थित होते.यावेळी भुजबळ साहेबांनी तो फोटो पाहून जुन्या आठवणींना उजाळा देत गोपीनाथरावांनी नेहमी ओबीसींच्या प्रश्नावर आवाज उठवला आणि नेहमी महात्मा फुले समता परिषदेसोबत खांद्याला खांदा लावून काम केलं असे उद् गार काढले.यावेळी समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS