मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवा परीक्षेत बदल करत मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचे नियोजन केले अ

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने यूपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवा परीक्षेत बदल करत मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचे नियोजन केले असून त्यासंदर्भात जाहिरात देखील प्रकाशित केली आहे. मात्र, एमपीएससी मंडळाबाबत सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळतो, मात्र ही परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच घेतली जाणार असून, यूपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.
एमपीएससी संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यूपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण वर्णनात्मक स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ड देतो आहोत, अशी माहितीही फडणवीस यांनी सभागृहात दिली. दरम्यान,अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना ह्या जागा भरण्यासंदर्भात पत्र दिले होते. सगळ्या राज्यांचा आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशात वर्ग ए दोन आणि तीन देखील आपण एमपीएससीला दिलेलं आहे. त्यातूनच, आपण एमपीएससीचे रिस्ट्रक्चरिंग करत आहोत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, अशात आपण त्यांच्यासोबत बोलणी करुन, त्यांचे ऐकून काही गोष्टी करतोय, अशी माहितीही डणवीसांनी सभागृहात दिली.
आभियांत्रिकी आणि कृषविषयक तांत्रिक परीक्षा मराठीतूनच होणार
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगत अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्याने या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात .पण आता लोकसेवा आयोगातील अभियांत्रिकी पदांसाठी होणार्या परीक्षा मराठीत होणार आहेत .अभियांत्रिकी पदांच्या अभ्यासक्रमांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होणार असून इतर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा ही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS