Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड प्रतिनिधी - नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, लोहा, कंधारसह इतर तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाला आ

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला
प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
हिंगोलीत भगरीमुळे 100 जणांना विषबाधा

नांदेड प्रतिनिधी – नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, लोहा, कंधारसह इतर तालुक्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह मागील तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले आहेत. त्यामुळे नांदेड-हैद्राबाद महामार्गाची एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. घरावरचे छप्पर उडालेत, नायगाव तालुक्यातील कहाळा येथे भिंत कोसळून एकजण ठार तर तीन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत तर घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. तसेच शेतकाऱ्यांचेही यात आतोनात नुकसान झाले आहे. अनेक गावातील पोल उन्मळून पडल्याने मागील तीन दिवसांपासून वीज गेली आहे. त्या गावांना खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेटी देत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

COMMENTS