चेन्नई : देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची मोठी धडपड सुरू असतांना तामिळनाडूतील एका खास
चेन्नई : देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांची मोठी धडपड सुरू असतांना तामिळनाडूतील एका खासदाराने तिकीट न मिळाल्याने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चार दिवसानंतर गुरूवारी या खासदाराचा मृत्यू झाला आहे. एमडीएमकेचे (वायको पक्ष) इरोडचे खासदार गणेशमूर्ती असे या खासदाराचे नाव आहे.
तामीळनाडू येथील एमडीएमकेच्या खासदार खासदार ए गणेश मूर्ती यांनी तिकीट न मिळाल्याने टोकाचे पाऊल उचलत रविवारी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असतांना गुरुवारी चार दिवसांनंतर त्यांची प्राणज्योत मालवली. गणेशमूर्ती हे एमडीएमकेचे (वायको पक्ष) इरोडचे खासदार होते. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते नाराज होते. यामुळे नैराश्यात गेल्याने 74 वर्षीय गणेशमूर्ती यांनी रविवारी किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने दवाखाण्यात भरती केले होते. गणेशमूर्ती यांनी सल्फास हे किटकनाशक त्यांनी प्राशन केल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर होती.त्यांना अत्यवस्थ अवस्थेत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी पहाटे 5:05 वाजता त्यांचे निधन झाले. मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघमच्या विद्यमान खासदाराच्या आशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी त्यांना उलट्या होत असल्याने बेशुद्ध झालेले खासदार ए. गणेशमूर्ती यांना आधी इरोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारानंतर त्यांना कोईम्बतूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
COMMENTS