Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून गांजा विक्री करणार्‍या सासू-सुनेला अटक

पुणे/प्रतिनिधी ः गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सासु-सुनेला अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 13 हजारांचा 20 क

बॉलीवूड कलाकारांची इफ्तार पार्टी
राज्यात आता हिंदुत्ववादी सरकार : राणे
पाचेगाव शिवारात आढळला तरूणाचा मृतदेह

पुणे/प्रतिनिधी ः गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सासु-सुनेला अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 13 हजारांचा 20 किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई लोणी काळभोर परिसरातील सोरतापवाडी चोरघे वस्तीनजीक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सोरतापवाडी परिसरात दोन महिला डोक्यावर पिशवी घेउन चालत होत्या. त्यावेळी पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी दोघींना थांबवून पिशव्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे तब्बल 20 किलो 600 ग्रॅम गांजा आढळून आला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, सहाय्यक निरीक्षक शैलेजा जानकर, सुजीत वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्वे, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नीतेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली. रेल्वेतून प्रवास करीत तस्करीसाठी गांजा घेउन आलेल्या सासु-सुनेला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 20 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून आणखी तपास सुरू आहे.


दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत हडपसर परिसरात गांजाची वाहतूक करणार्‍या महिलेसह दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली. त्यांच्याकडून 21 किलो 690 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. दोघांकडून सव्वा चार लाखांचा गांजा, तीन मोबाइल, मोटार असा 10 लाख 64 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अक्षय भिमा गाडे (वय 25 रा-शिवाजी नगर, नालेगाव, ता. जि. अहमदनगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हडपसर परिसरात महिलेसह दोघेजण गांजा वाहतूक करणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथक दोनला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस डी नरके, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून मोटारीतून चाललेल्या दोघांना थांबवले. त्यांच्या मोटारीत 21 किलोवर गांजा आढळून आला.

COMMENTS