पुणे/प्रतिनिधी ः आई आणि मुलांचे नाते फार अतुट असते. आपल्यासमोर आईचा जीव जाताना पाहणे हा प्रसंग फार वेदनादायी आहे. पुण्यात अशीच एक मन सुन्न करणारी
पुणे/प्रतिनिधी ः आई आणि मुलांचे नाते फार अतुट असते. आपल्यासमोर आईचा जीव जाताना पाहणे हा प्रसंग फार वेदनादायी आहे. पुण्यात अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या दोन्ही आई वडिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सोनी कश्यप असे मृत महिलेचे नाव आहे. तर अशोक कश्यप बाबा आणि रणजित असे मुलाचे नाव आहे. कश्यप दाम्पत्य कुंजीरवाडीत कामाला होते. शनिवारी दुपारी आपल्या चार मुलांना घेऊन ते फिरायला निघाले. दुपारी ते मुठा उजवा कालव्याजवळ आले होते. येथे आल्यावर सर्व मुले खेळू लागली. काही वेळातच रणजित पोहण्यासाठी कालव्यात गेला. कालव्यातील पाणी अचानक वाढू लागले. आपला मुलगा पाण्यात वाहून जात असल्याचे आईच्या लक्षात आले. कसलाही विचार न करता आईने तातडीने कालव्यात उडी घेतली. आपल्या मुलाचा जीव वाचवण्याचा तिने फार प्रयत्न केला. मात्र या महिलेला पोहता येत नव्हते. मुलगा आणि पत्नीला पाहून अशोकनेही पाण्यात उडी घेतली. त्याने आधी मुलाचा जीव वाचवला. मुलाला पाण्यातून बाहेर काढले. नंतर पत्नीचा जीव वाचवण्यासाठी तो पुन्हा पाण्यात गेला. मात्र तोवर कालव्यातल्या पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला होता. यात पती पत्नी दोघेही वाहून गेले. हा धक्कादायक प्रसंग चारही मुलांनी स्वताःच्या डोळ्यांनी पाहिला. सदर घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना आईचा मृतदेह सापडला आहे. वडिलांच्या मृतदेहाचा अद्यापही शोध सुरू आहे.
COMMENTS