Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुक्त विद्यापीठ प्रवेशद्वार ते गोवर्धन गाव रस्त्याच्या दुतर्फ़ा साडेचारशेहून अधिक सिल्व्हर ओक वृक्षलागवड

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अल्युमनी असोसिएशनतर्फे विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने सिल्वर ओक व बहावाची

शालेय विद्यार्थ्यांना दिले शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण
कृषी छाया 2025 वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Displaying सिल्वर ओक वृक्षलागवड.jpeg

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अल्युमनी असोसिएशनतर्फे विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने सिल्वर ओक व बहावाची पाचशेपेक्षा अधिक वृक्षलागवड करण्यात आली. विद्यापीठ प्रवेशद्वार ते विद्यापीठ फाटा गोवर्धन गावापर्यंत साधारण दोन किलोमीटर अंतरापर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा जवळपास साडेचारशे सिल्वर ओकची लागवड करण्यात आली. तसेच विद्यापीठ अंतर्गत परिसरात मैदानाभोवती ५० बहावाची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते या वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे म्हणाले की विद्यापीठ स्थापनेपासून परिसरात वनराई फुलवण्याचे – वृक्षसंपदा जतन करण्याचे कार्य विद्यापीठ करत आले आहे. आजच्या या वृक्षलागवडीमुळे गोवर्धन गाव विद्यापीठ फाटा ते विद्यापीठ प्रवेशद्वार दरम्यान आता झाडांची देखणी आरास बघावयास मिळणार आहे, जी पर्यावरण पूरक – पोषक सोबत वाटसरुंना मुबलक शुद्ध हवा व शीतल छाया प्रदान करणारी राहतील. बहावाच्या झाडांमुळे तर उन्हाळ्यात पिवळ्या धमक सुवर्णकांती फुलांनी विद्यापीठ परिसर अधिक नेत्रसुखद राहील, असे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी आजचे वृक्षारोपण हे विद्यापीठाचा विस्तार व परिवार वाढत असल्याचे प्रतिक असल्याचे सांगितले. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. नितीन ठोके, सेवा सुविधा प्रमुख श्री. सुनील निकम, उद्यान विभागाचे श्री. माधव माळी यांच्यासह विद्यापीठ अधिकारी – कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

COMMENTS