Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडा सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे रिक्त

मुंबई : मुंबईतील चार हजार 82 घरांसाठी काढलेल्या सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे विविध कारणांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या

ललितपूरमध्ये मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू
गॅस सिलेंडर 209 रुपयांनी महागला
जयभिम महोत्सवात 132 रक्तदात्यांचे रक्तदान

मुंबई : मुंबईतील चार हजार 82 घरांसाठी काढलेल्या सोडतीतील अडीचशेहून अधिक घरे विविध कारणांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अखत्यारीतील मुंबई गृहनिर्माण मंडळाकडे परत आली आहेत. ही घरे नियमाप्रमाणे प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना वितरित करणे आवश्यक होते. परंतु प्रतीक्षा यादीच शिल्लक न राहिल्यामुळे ही घरे आता रिक्त राहणार आहेत. ही घरे मुंबई मंडळाच्या पुढील सोडतीत उपलब्ध असतील.
किंमत परवडत नाही, वेळेत पैसे न भरणे, पती व पत्नीचे उत्पन्न न दाखवणे, एकापेक्षा अधिक घरे सोडतीत मिळणे यासह इतर कारणांमुळे मुंबई मंडळाकडे अडीचशेहून अधिक घरे परत आली आहेत. या घरांचे वितरण करण्यासाठी प्रतीक्षा यादी शिल्लक नसल्याची बाब लक्षात आली आहे. पूर्वीप्रमाणे शंभर टक्के प्रतीक्षा यादी असती तर ही घरे शिल्लक राहिली नसती, असे एका अधिकार्‍याने सांगितले. सध्या म्हाडाने किमान एक आणि कमाल दहा टक्के प्रतीक्षा यादी निश्‍चित केली आहे. मध्यंतरी म्हाडाने प्रतीक्षा यादी ही पद्धतच बंद करण्याचे ठरविले होते. तसे झाले असते तर आणखी काही घरे रिक्त राहिली असती. आता म्हाडाने प्रस्ताव पाठवून पूर्वीप्रमाणेच प्रतीक्षा यादी असावी वा प्रतीक्षा यादी किती असावी, याचे अधिकार म्हाडाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर म्हाडाला पुन्हा पूर्वीप्रमाणे प्रतीक्षा यादी ठेवता येईल. पूर्वी ही प्रतीक्षा यादी वर्षानुवर्षे कायम असायची. आता प्रतीक्षा यादीची मुदत वर्षभर असावी, असे प्रस्तावात म्हटले आहे. 2019 च्या सोडतीत मुंबई मंडळाने एकास पाचशे अशी प्रतीक्षा यादी तयार केली होती. त्यामुळे त्या सोडतीत फारशी घरे शिल्लक राहि  ली नाहीत. साधारणत: जितकी घरे तेवढीच प्रतीक्षा यादी ठेवण्याची म्हाडाची पद्धत होती. मुंबई वगळता इतर मंडळात ही यादी एकास पाचशे वा त्यांना आवश्यकता भासेल तशी ठेवण्याची मुभा त्यामुळे संबंधित मंडळांना मिळणार आहे. म्हाडाच्या सोडतीबाबत सुरेश कुमार समितीने दिलेल्या अहवालात प्रतीक्षा यादी किती असावी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादी किती असावी याचा निर्णय प्रत्येक सोडतीत किती प्रतिसाद मिळतो यावर निश्‍चित करता येईल. त्यामुळे गरजू व्यक्तीला घर मिळू शकेल, याकडे या अधिकार्‍याने लक्ष वेधले.

COMMENTS