Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधान दिनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

सांगली : अधिक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांच्याशी चर्चा करताना महेश खराडे, भागवत जाधव, संजय बेले, भरत चौगुले व कार्यकर्ते. इस्लामपूर / प्रतिनिधी :

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार
कराड येथील 25 घरांना आग; सिलेंडर स्फोटाने शहर हादरले
महाविद्यालयीन युवकाशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी हावलदाराविरुध्द गुन्हा दाखल

इस्लामपूर / प्रतिनिधी : वीज तोडणी थांबवा, वसुली थांबवा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयावर शुक्रवार, दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी मोर्चा काढला. यावेळी कार्यालयाच्या गेटवर मोर्चा अडविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्याच्या धुमचक्री झाली. पोलीसाचे कडे तोडत कार्यकर्ते आतमध्ये घुसले. यावेळी प्रती मोटर तीन हजार रुपये भरून घेण्याची तयारी वीज वितरण अधिकार्‍यांनी दर्शिविली. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.
मोर्चास विश्रामबाग चौकातून प्रारंभ झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुषपहार घालून झाला. वीज तोडणी थांबलीच पाहिजे, ऊर्जा मंत्र्याचे करायचे काय खाली मुंडी वर पाय, अशा घोषणा देत मोर्चा वालचंद कॉलेज मार्गे स्फूर्ती चौकातील महावितरण कार्यालयावर पोहचला. या ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये जोरदार धूमचक्री झाली. पोलिसाचे कडे तोडत कार्यकर्ते आतमध्ये घुसले या यावेळी जोरदार वादावादी झाली सर्व कार्यकर्त्यांना महेश खराडे यांनी शांत केले.
यावेळी आंदोलकांसमोर खराडे म्हणाले, महावितरण कंपनी राजकीय दबावामुळे वीज तोडणी करत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक होईपर्यंत वसुली आणि तोडणी बंद होती. पण निकाल जाहीर होताच तोडायला सुरुवात केली. राज्यातील अडीच लाख तीन एचपी वीज वापरणार्‍या शेतकर्‍यांना पाच एचपीची बिले दिली आहेत तर दीड लाख पाच एचपी मोटर वापरणार्‍यांना साडे साथ एचपीची बिले दिली आहेत. ही अन्यायी बिले आहेत दिवसा वीज द्या सर्व बिले भरतो. पण आमच्या मागणी प्रमाणे वीज देणार नसाल तर वीज बिल का भरायचे हा आमचा सवाल आहे. सर्व अधिकारी भ्रष्ट आहेत तोडायला येणार्‍यांना बदडून काढा. कार्यालये पेटवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भागवत जाधव यांनी स्वागत व मार्गदर्शन केले. भरत चौगुले, राजेंद्र माने, संजय बेले, संजय खोल्खुंबे, गुलाब यादव, विश्‍वनाथ गायकवाड, प्रभाकर पाटील, मानसिंग पाटील यांची भाषणे झाली. त्यानंतर अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, संजय माळी यांच्यासह अधिकार्‍याच्या बरोबर चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी प्रती मोटर तीन हजार रुपये भरण्याचा तोडगा निघाला.
यावेळी बाबा सांद्रे, राजेंद्र पाटील, जगन्नाथ भोसले, भुजंग पाटील, महेश जगताप, संदीप शिरोटे, प्रकाश देसाई, प्रताप पाटील, भैरवनाथ डवरी, प्रदीप पाटील, रवीकिरण माने, गुंडा आवटी, भास्कर मोरे, सुदर्शन वाडकर, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी उपस्थित होते.

COMMENTS