Homeताज्या बातम्यादेश

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

उष्णतेची तीव्रता होणार कमी केरळमध्ये पावसाची हजेरी

नवी दिल्ली ः देशामध्ये प्रचंड उष्णतेची लाट असून, राजधानी दिल्लीचे तापमान तब्बल 52 अंशांवर पोहचले असतांनाच, मान्सून गुरूवारी केरळमध्ये दाखल झाल्या

गोखले पुलाचे काम रखडण्याची चिन्हे
झाडाखाली उभी असलेली बस जळून खाक
आज गौतमीपुत्र कांबळे बीड दौर्‍यावर : अनिल डोंगरे

नवी दिल्ली ः देशामध्ये प्रचंड उष्णतेची लाट असून, राजधानी दिल्लीचे तापमान तब्बल 52 अंशांवर पोहचले असतांनाच, मान्सून गुरूवारी केरळमध्ये दाखल झाल्यामुळे दिलासा मिळतांना दिसून येत आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे तापमान काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे. यंदा मान्सून हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या एक दिवस आधी दाखल झाला आहे.
बंगालच्या उपसागरात आलेल्या रेमल चक्रीवादळाचा परिणाम केरळमध्ये येणार्‍या मान्सूनवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसेच काहीही झाले नाही. त्यामुळे हवामान तज्ञांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.  रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान केरळमध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस होत असून, गुरूवारी केरळमध्ये जोरदार पाऊस झाला. दरम्यान इशान्य भारतात 5 जून पर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज आहे. मान्सून महाराष्ट्रात 9 ते 16 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये 5 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 27 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल होईल. नैऋत्य मोसमी मान्सूनने केरळमध्ये प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारताच्याही बहुतांश भागांत मान्सूनने प्रवेश केला आहे, अशी माहिती हवामान विभागाने ट्वीट करून दिली आहे. देशात मान्सून कधी दाखल होणार याची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळामुळे केरळ आणि ईशान्य भारतात मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम झाला आहे. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 5 जून आहे. या कालावधीत दक्षिण अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग, कोमोरिन, लक्षद्वीप, नैऋत्य आणि मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांच्या काही भागांवर प्रबळ होण्याची दाट शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पश्‍चिम मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

मान्सून महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत होणार दाखल – केरळमध्ये दाखल झालेल्या या मान्सूनचा प्रवास पुढे केरळ, कर्नाटक महाराष्ट्र असा होणार आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून 10 जूनला दाखल होईल. त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. शिवाय राज्यातल्या अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या आहे. पाऊस झाल्यात तो प्रश्‍नही मार्गी लागेल. त्यामुळे सर्वच जण 10 जूनची वाट पाहात आहेत.

COMMENTS