नवी दिल्ली- देशात मंकीपॉक्सचे(monkeypox) रुग्ण सापडून आता आठवडा उलटला आहे. पहिले तिन्ही रुग्ण हे केरळात सापडले आहेत. पहिला रुग्ण कोल्लम(Kollam) चा
नवी दिल्ली- देशात मंकीपॉक्सचे(monkeypox) रुग्ण सापडून आता आठवडा उलटला आहे. पहिले तिन्ही रुग्ण हे केरळात सापडले आहेत. पहिला रुग्ण कोल्लम(Kollam) चा रहिवासी आहे, त्याचे वय 35 आहे आणि 12 जुलैला हा रुग्ण दुबई प्रवासावरुन परतला होता. दुसरा रुग्ण कन्नूर(Kannur) चा रहिवासी आहे. हाही रुग्ण 13 जुलैला दुबईहून परतला होता. तिसरा रुग्ण हा मल्लपूरम(Mallapuram) चा रहिवासी आहे, हा रुग्ण 6 जुलैला अरब अमिरात मधून परतला होता. चौथा रुग्ण दिल्लीत सापडला आहे. या रुग्णाने परदेशी प्रवास केला नव्हता. मनाली(Manali) त एका पार्टीत सामील होऊन काही दिवसांपूर्वीच तो दिल्लीत (Delhi update) परतला होता. या चारही प्रकरणात संक्रमित रुग्ण हे पुरुष आहेत आणि त्यांचे वय 35 च्या आसपास आहे. परदेशात न जाताही मंकी पॉक्स झालेला रुग्ण सापडल्याने दिल्लीतील नागरिकांत भीती पसरली आहे.

COMMENTS