Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाहितेचा विनयभंग करणे आले अंगलट

दोन वर्ष सक्तमजुरीसह 50 हजाराचा दंड न्यायालयाने ठोठावला

संगमनेर ः विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास ह

LokNews24 l बाळ बोठेवर अ. नगर पोलिसांची मोठी कारवाई
नाभिक समाज ट्रस्टतर्फे समाजमित्र, कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण
नेवाशातील अल अमीन उर्दू हायस्कूलचा 100 टक्के निकाल

संगमनेर ः विवाहित महिलेचा विनयभंग करणे चांगलेच अंगलट आले आहे. संगमनेरच्या न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत दोन वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिल संभाजी साबळे (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून 2009 मध्ये आरोपी अनिल साबळे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांनी तपास करत संगमनेर न्यायालयात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. फौजदारी कनिष्ठ स्तर न्यायाधीश प्राची पालवे यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात सरकारी वकील राहुल शेळके यांनी पाच साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर नोंदविली. यात फिर्यादी पीडित विवाहित महिला आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीचे वकील आणि सरकार पक्षाचे वकील यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश पालवे यांनी आरोपीला दोषी ठरविले. दोषी ठरलेल्या आरोपी अनिल संभाजी साबळे याला पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यामध्ये सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्पना हासे यांनी सहाय्य केले.

COMMENTS