Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकदरेत ‘ओम श्री मोखाजी बाबा’ यात्रा उत्साहात

अकोले ः अकोले तालुक्यातील एकदरे येथे सालाबादप्रमाणे यंदाही ‘ओम श्री मोखाजी बाबा’ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. ए

Akole : राजूर येथे आगळे वेगळे गणेश विसर्जन
रंधा येथे राबविले स्वच्छता अभियान
अकोलेत ग्राहक दिनी तक्रारींचा पाऊस

अकोले ः अकोले तालुक्यातील एकदरे येथे सालाबादप्रमाणे यंदाही ‘ओम श्री मोखाजी बाबा’ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. एकदरे, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी आणि जायनावाडी येथील समस्त ग्रामस्थांच्या पुढाकारातून तसेच मोखाजी बाबा आदिवासी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रोत्सवात भाविक, दुकानदार, रसिक प्रेक्षक तसेच पैलवानांची मोठी उपस्थिती लाभली. पहिल्या दिवशी सकाळी ढोल-ताश्याच्या गजरात मोखाजी बाबा यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुसर्‍या दिवशी देवाला धोतर, शाल, टोपी, चोळी, फडकी आदी वस्त्रे अर्पण करून मांडव उभारण्यात आला. त्यानंतर मूर्तीची विधीवत स्थापना करून सर्व भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. रात्री जागरण-गोंधळ व मल्हारीचा कार्यक्रम पार पडला. तिसर्‍या दिवशी सकाळी भाविकांनी नवस फेडण्याचा कार्यक्रम केला. चौथ्या दिवशी सकाळी एकदरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भीमाशंकर भजनी भारुड मंडळाचा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला. पाचव्या दिवशी यात्रेचा समारोप जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमाने झाला. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. नवसाला पावणारा मोखाजी बाबा हे भाविकांचे श्रद्धास्थान असून गुरुवारी महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. यात्रेच्या काळात दुकानदार, रहाट-पाळणा चालक, कुस्तीपटू तसेच सर्व ग्रामस्थांनी या उत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला. यात्रा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी चार दिवस दान करणार्‍या व देणगीदारांचे यात्रा समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

COMMENTS