Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दलित तरुणांचा अमानवीय छळ करणारा मुख्य आरोपी मोकाटच  

हरेगाव येथील घटना शेळी आणि कबतूर चोरीच्या आरोपांवरून लघुशंका करत, बेदम मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये केवळ शेळी आणि कबूतर चोरीच्या आरो

राज्यात उन्हाचा तडाखा वाढला
ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम
मुळा डाव्या कालव्यातून तात्काळा आवर्तन सोडण्यात यावे ः तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावमध्ये केवळ शेळी आणि कबूतर चोरीच्या आरोपांवरून चार दलित पुरूषांना अमानवयीय पद्धतीने झाडाला उलटे टांगून, कपडे काढून बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. अखेर याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली असली तरी, यातील मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहे, त्याला अटक करण्याची मागणी होत आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव गावात शेळी आणि काही कबुतरे चोरल्याच्या संशयावरून चार दलित पुरुषांना झाडाला उलटे टांगण्यात आले आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली, तर इतर पाच जण फरार आहेत. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेच्या निषेधार्थ गावात मोर्चा देखील काढण्यात आला. युवराज गलांडे, मनोज बोडके, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरग अशी आरोपींची नावे आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार तरूणांना जबर मारहाण करण्यात आली होती. यातील दोघे जण हे अल्पवयीन व दलित समाजातील आहेत. हरेगाव येथील युवराज नानासाहेब गलांडे यांच्या घरासमोरून एक वर्षापूर्वी शेळ्या व कबुतरे चोरी गेली होती. ती या चौघा तरुणांनी चोरल्याचा गलांडे यांना संशय होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातून पकडून अज्ञात ठिकाणी नेत झाडाला उलटे लटकवून जबर विवस्त्र करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली. यात जखमी पुरुषांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली. पीडित चौघा तरुणांवर आरोपींनी लज्जास्पद वर्तन केले. पीडितांवर लघुशंका केली गेली. आरोपींची गावामध्ये गेली अनेक वर्षे दहशत असून अनेक बेकायदा कृत्य यापूर्वी केले आहेत. आरोपी नानासाहेब गलांडे याच्यावर 13 गुन्हे दाखल आहेत. या मारहाणीच्या घटनेविरूद्ध आंबेडकरी समाजाने श्रीरामपूर नेवासे राज्यमार्गावर रविवारी रास्तारोको आंदोलन केले. या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक व कठोर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दोन आरोपींना अटक तसेच आणखी एका दोषीला आरोपी केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच आरोपी युवराज गलांडे याचे वडील नानासाहेब गलांडे याला आरोपी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

COMMENTS