Homeताज्या बातम्याक्रीडा

वनडे क्रमवारीत मोहम्मद सिराज अव्वल क्रमांकावर

नवी दिल्ली प्रतिनिधी - आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत मोहम्मद सिराज हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. सिराजने श्रीलंका आणि

विराट कोहली च्या फोटोने चिंता वाढली
‘‘मै झुकेगा नही…”, जडेजानं मैदानातच केली ‘पुष्पा’ची रावडी स्टेप | LokNews24
जावलीतील शाळांमधे ’गुढीपाडवा; पट वाढवा’ अभियानास प्रारंभ; जिल्हा परिषदेचा उपक्रम

नवी दिल्ली प्रतिनिधी – आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत मोहम्मद सिराज हा जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार गोलंदाजी केली आणि त्याचा त्याला एकदिवसीय क्रमवारीत फायदा झाला. सिराज शिवाय शमी आणि शुभमन गिल यांनाही एकदिवसीय क्रमवारीत उत्कृष्ट कामगिरीचा लाभ मिळाला आहे. सिराजने गेल्या वर्षभरात वनडेमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. यानंतर ट्रेंट बोल्टला हटवून तो वनडेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. 2019 मध्ये एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात करणारा सिराज या फॉरमॅटमध्ये भारतासाठी जास्त सामने खेळत नव्हता. फेब्रुवारी 2022 मध्ये तो भारताच्या एकदिवसीय संघात परतला. यानंतर त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 

भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर सिराजने 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37 विकेट घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 28 वर्षीय सिराज प्रथमच एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. भारताचे गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली सिराजने अतिरिक्त प्रशिक्षण घेतले आणि त्याच्या खेळाच्या अनेक पैलूंवर काम केले. याचा लाभ त्यांना मिळाला आहे. 

सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत नऊ विकेट घेतल्या आणि सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही चार विकेट्स घेतल्या. यानंतर तो 729 रेटिंग गुणांसह वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. मात्र, तो दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडपेक्षा फक्त दोन रेटिंग गुणांनी पुढे आहे.

COMMENTS