Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

सरपंचपदी भीमराव कापसे यांची बिनविरोध निवड

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी व पांडववस्ती या गृप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे भीमराव कापस

जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
आखोणी ग्रामस्थांचे कर्जत पंचायत समितीसमोर उपोषण
शाळेच्या खोलीतून गॅस टाकीची चोरी 

जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यातील मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी व पांडववस्ती या गृप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे भीमराव कापसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मोहा ग्रामपंचायतची गेल्या अडीच वर्षापूर्वी निवडणूक झाली होती. यामध्ये शिवाजी डोंगरे यांची सर्व सदस्यांच्या सहमतीने बिनविरोध निवड झाली होती.
या निवडणुकीत शिवाजी डोंगरे यांनी आपला अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत दिलेल्या शब्द पाळून आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला. ठरल्याप्रमाणे सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या साक्षीने भीमराव कापसे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने सोम 9 ऑक्टोबर रोजी भीमराव कापसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थांनी त्यांची गावात वाजत गाजत मिरवणूक काढली होती.  यावेळी नवनिर्वाचित सरपंच भिमराव कापसे आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की मी गेल्या अडीच वर्षांत कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी विषेश लक्ष घालून विविध विकास कामांना भरपूर नीधी दिला आहे. या पुढेही आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली मोह ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोहा, रेडेवाडी, हापटेवाडी, नानेवाडी व पांडववस्ती या गावांचा विकास करणार आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साकत मंडल अधिकारी अभिमन्यू शिरसठ, तलाठी प्रशांत जमदाडे, ग्रामसेवक प्रशांत सातपुते, यांनी काम पाहिले. या वेळी ग्रामपंचायत माजी सरपंच शिवाजी डोंगरे, वामन डोंगरे, विकास सांगळे, पंडित गायकवाड, वसंत झेंडे, पांडुरंग देडे, विनोद इंगळे, तसेच रावसाहेब रेडे, नामदेव घुमरे, हापटे सर, प्रमोद देडे, दासु रेडे, वैभव गायकवाड, बाबासाहेब डोंगरे, बाप्पु डोंगरे, कुंडल डोंगरे, जयसिंग हापटे, दिनकर भीसे, सतिश इंगळे, शिवाजी कापसे, दिलीप देडे सह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

COMMENTS