नवी दिल्ली/प्रतिनिधी ः नुकतीच केदारनाथ यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतांना, अनेकांकडून या परिसरातील, तसेच मंदिराचे फोटो काढण्यात येत आह

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः नुकतीच केदारनाथ यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतांना, अनेकांकडून या परिसरातील, तसेच मंदिराचे फोटो काढण्यात येत आहे. मात्र या फोटामुळे मंदिरातील पावित्र्य नष्ट होत असल्याचा आरोप करत, श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकार्यांनी मंदिर परिसरात मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिरात तसेच या परिसरातील फोटो, व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी घातली आहे.
चार धाम यात्रेतील महत्वाचे ठिकाण असणार्या केदारनाथ मंदिर परिसरात आता मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या सोबतच मंदिर परिसरात रिल्स बनवण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी रिल्स बनवणे तसेच फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता तर फोन वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून केदारनाथ मंदिराचे अनेक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाणे, फोटो काढणे आणि व्हिडिओ बनवणे यावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिराच्या व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासंदर्भातील फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावले आहेत. मंदिराच्या आवारात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिरात कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई असून तुम्ही सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या निगराणीखाली आहात, असे या फलकांमध्ये सांगण्यात आले आहे. या सोबतच मंदिरात येतांना पूर्ण कपडे घालण्यात यावे असे देखील सांगण्यात येत आहे. या पुढे मंदिर परिसरात तंबू किंवा छावणी उभारणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे देखील म्हटले आहे. जर कुणी असे करताना सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देखील हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेल्या या फलकांवर लिहिले आहेत. अलीकडेच, गढवाल हिमालयात स्थित केदारनाथ मंदिरात बनवलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्याबद्दल तीर्थयात्रेच्या पुजार्यांपासून सामान्य भाविकांपर्यंत आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही आक्षेप घेतला आणि धार्मिक स्थळांवर अशा कृत्यांचा निषेध केला.
कपड्यांबाबतही नियम कठोर – मंदिरात येतांना अंगावर माफक कपडे देखील घातलेले असावे असे मंदिर प्रशासाने म्हटले आहे. याचे फलक मंदिर प्रशासाने मंदिराच्या आवारात लवलेले आहेत. काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरात एका जोडप्याने प्रपोज केल्याचा व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मंदिर प्रशासाने अनेक बाबींवर आता बंदी घातली आहे.
COMMENTS