Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बसमध्ये विसरलेला मोबाईल प्रवाशाला केला परत

कोपरगाव आगाराचे वाहक माळी यांचा प्रामाणिकपणा

कोपरगाव तालुका ः आपल्याजवळील हरवलेल्या वस्तुची प्रत्येकालाच चुटपूट लागत असते. प्रामाणिक अप्रामाणिकपणावर नेहमीच चर्चा होते पण कोपरगांव आगारातील वा

धुम स्टाईलने वृद्धेच्या गळ्यातील गंठण लांबविले
तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, २५ जून २०२१ l पहा LokNews24
पिंपळनेर येथे संत निळोबाराय यात्रेची जय्यत तयारी

कोपरगाव तालुका ः आपल्याजवळील हरवलेल्या वस्तुची प्रत्येकालाच चुटपूट लागत असते. प्रामाणिक अप्रामाणिकपणावर नेहमीच चर्चा होते पण कोपरगांव आगारातील वाहक ए. पी. माळी हे त्याला अपवाद आहेत, प्रवासात बसमध्ये विसरलेला महागडा मोबाईल त्यांनी प्रवाशाला परत करत कर्तव्यात चोख असल्याचे दर्शन दिले आहे.
           याबाबतची माहिती अशी की, कोपरगांव आगारातील वाहक ए. पी. माळी आणि वाहक श्री. शेख हे बुधवारी बस क्रमांक एम. एच. 07-9121 मुक्कामी सत्यगांवी घेवुन गेले. गुरूवारी (27 जून) ही बस परत कोपरगांवी आगारात आली. सत्यगांवहुन कोपरगांवी आलेले बस मधील सर्व प्रवासी उतरलेही त्या गडबडीत एका महिला प्रवाशाचा महागडा मोबाईल बसमध्ये विसरला. गोधेगांवच्या दिशेने बसचा प्रवास सुरू झाला. कोपरगांवी उतरलेल्या महिलेला तिच्या मोबाईलची आठवण झाली तीने आगारात चौकशी करता वाहक ए. पी. माळी यांच्या मोबाईलवर कॉल केला. बस तोपर्यंत साईबाबा कॉर्नरपर्यंत आली होती. सदर महिला एका मोटारसायकलस्वाराच्या सहायाने साईबाबा कॉर्नरपर्यंत आली वाहक ए. पी. माळी यांनी त्या महिलेला तिचा महागडा मोबाईल परत केला त्यावर त्या महिलेने वाहकाचे आभार मानले आणि ती निघुन गेली. वाहक ए. पी. माळी यांच्या तोडुन कष्टाचे पुरत नाही तर असे फुकटचे घेवुन काय करायचे असे शब्द निघाले त्यांच्या या प्रामाणिकपणाचा सर्वत्र लौकिक होत आहे.

COMMENTS