Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसेचे महामार्ग विरोधातील उपोषण तिसर्‍या दिवशी मागे

पाटण : तहसीलदार अनंत गुरव याचे हस्ते पुरण पोळीचा घास घेत उपोषण सोडताना मनसेचे तालुका अध्यक्ष गोरख नारकर. (छाया : शितल साळुंखे) कोयनानगर / वार्ता

सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा द्यावी : दिलीप जगदाळे
सर्वांसाठी ५जी सह कनेक्टीाव्हीसटीमध्ये नवीन सुधारणा! 
सीरमला मोठे यश प्राप्त; गर्भाशयाच्या कर्करोगावर मात करणारी देशातील पहिली लस केली विकसित.

कोयनानगर / वार्ताहर : कराड-चिपळूण मार्गाच्या रूदीकरण कामाविरोधातील मनसेचे आमरण उपोषण अखेर तिसर्‍या दिवशी बेंदराची पुरण पोळी खाऊन सोडण्यात आले. महामार्ग विभागाने लेखीपत्राद्वारे विविध मागण्यांसंदर्भातील स्पष्टीकरण देत उर्वरीत काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करत असल्याचे आश्‍वासन दिल्याने तहसिलदार अनंत गुरव भाजपचे समन्यवक विक्रम बाबा पाटणकर कराड तालुका अध्यक्ष दादा शिंगण यांचे हस्ते सरबत पिऊन व बेंदुर असल्याने पुरण पोळीचा घास भरवत मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, संजय सत्रे, राहुल संकपाळ, चंद्रकांत बामणे, राम माने, हणमंत पवार आदी पदाधिकार्‍यांनी तीन दिवसांनंतर उपोषण मागे घेतले आहे.
यावेळी उध्दव सेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, सुरेश पाटील, बाळासाहेब जगताप, प्रशांत पाटील, लक्ष्मण चव्हाण, मनोहर यादव, अधिकराव पवार, संतोष देशमुख, अरविंद पवार, संभाजी चव्हाण, महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता आर. एस. मणेर, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, मनसैनिक व सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गुहागर-विजापुर महामार्गावरील कराड-पाटण दरम्यानचे काही ठिकाणी निकृष्ट काम, ठेकेदार कंपनीकडून दंड वसूल, वृक्ष लागवड तसेच काही दिवसापूर्वी पाटण ते संगमनगर वाहतूक बंद ठेवल्याबद्दल ठेकेदार कारवाई करावी आदी मागण्यासाठी मनसेने सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले होते. ते बुधवारी तिसर्‍या दिवशी मागण्यांवर महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रृती नाईक यांनी लेखी पत्राद्वारे खुलासा केल्याने अखेर उपोषण स्थगित केले.

COMMENTS