मुंबई प्रतिनिधी - गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे

मुंबई प्रतिनिधी – गेल्या १२-१३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला आहे. महामार्ग पूर्ण होऊन सुलभ प्रवास करता यावा याकरता राज ठाकरेंकडून निर्धार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या प्रकरणात आता मनसेने आक्रमक भूमिका घेत अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढली जाणार असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेकडून २३ ते ३० ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गावर पदयात्रा काढण्यात येणार आहे. मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येणार असून मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि शासनासमोर मांडण्यात येणार आहे. एकूण तीन टप्प्यात या पदयात्रेचे नियोजन करण्यात येणार असून पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात गाव जनजागृती अभियान करण्यात येईल.
COMMENTS