Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंग्यावरून मनसे पुन्हा आक्रमक; प्रकाश महाजन यांच्याकडून कारवाईची मागणी

बीड प्रतिनिधी - बीडमधली एक पुरातन वास्तू सध्या चर्चेचा विषय ठरतेय. काहीजण इथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करतायत, तर काही जण ही मशिद असल्याचा दावा

जमिनीचा वाद पेटला, रस्त्यात अडवून शेतकर्‍याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
रेल्वेची 25 टक्क्यांपर्यंत भाडेकपात

बीड प्रतिनिधी – बीडमधली एक पुरातन वास्तू सध्या चर्चेचा विषय ठरतेय. काहीजण इथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करतायत, तर काही जण ही मशिद असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहे. तर सापडलेली वास्तू मंदिर आहे की, मशिद या अनुषंगाने बीडमध्ये मनसेच्या वतीने आज एक सभेचं आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी सभेला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आपल्या भाषणातून महाजन यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत, आजही मोठ्या आवाजात वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई होत नसल्याचं म्हटले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत कायदा होऊन देखील काद्यायाचे पालन केले जात नाही. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात भोंग्यावरून आवाज अयाकाला मिळत आहे. मात्र यावर कुठलेही कारवाई होत नाही. मात्र उलट आम्हालाच देशांमध्ये भाषण करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अजाणच्या संदर्भात देखील योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रकाश महाजन यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाच विरोध का होतो?
अकोला येथील बार्शीटाकळी या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर यावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. तर स्वत:ला हिंदू म्हणून घेणारे जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे या संदर्भात काहीच बोलत नाही. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध होत असताना कुठलाच राजकीय पक्ष का बोलत नाही? असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.
पुरातन वास्तूवरून वेगवेगळे दावे…
बीडमधली एक पुरातन वास्तू पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचा दावा केला जात असताना याच ठिकाणी मस्जिद असल्याचा देखील होत आहे. दरम्यान याच वादात मनसेने देखील उडी घेतली आहे. या ठिकाणी मंदिरच असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत मनसेकडून आज जाहीर सभा देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात याच मुद्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर प्रशासनाकडून देखील या सर्व वादावर विशेष लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

COMMENTS