Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 ड्रग्स प्रकरणात आमदार खासदार हप्ते घेतात 

खा. संजय राऊत यांचा घाणाघात

लोकमंथन प्रतिनिधी -  ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर ड्रग्स प्रकरणावरून जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून

  उदयनराजे यांचे अश्रू म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे अश्रू  
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल
संजय राऊतांच्या ईडी कारवाई संदर्भात मनसे प्रवक्ते प्रकाश महाजनांचा गौप्यस्फोट.

लोकमंथन प्रतिनिधी –  ड्रग्स माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर ड्रग्स प्रकरणावरून जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. ही टीका सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. ड्रग्स प्रकरणात आमदारांना किती हप्ता मिळायचा याची माहितीच संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या विधानावर राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. ठाकरे गटाने ड्रग्स विरोधात नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी संजय राऊत आज नाशिकमध्ये आले होते (दि.१९) यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. काल मला पोलीस सूत्रांनी एक कागद दिला. त्यात ड्रग्स प्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचे आकडे होते. ते पाहून मला धक्काच बसला. एका आमदाराला १६ लाखांचा हप्ता मिळतो. असे सहा आमदार आहेत. हे रॅकेट मोठं आहे. साधं सोपं नाही. फडणवीस यानी शाहजुगपणा करू नये. प्रतिष्ठा सांभाळावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असं संजय राऊत म्हणाले.

कसलं नेक्सस उघड होईल ? – ड्रग्स प्रकरणातील नेक्सस उघड होईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नेक्सस उघड झालं आहे. फडणवीस यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते भरकटल्यासारखे बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. त्यांच्या आसपास जी माणसं आहेत ना या नशेच्या बाजारात फिरत आहेत. त्या नशेबाजांमुळे फडणवीस यांची मती गुंग झाली आहे. कसले नेक्सस उघड होईल? तुम्ही गृहमंत्री आहात. एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि तुम्ही राजकारण करताय? असा सवाल राऊत यांनी केला.

COMMENTS