Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांना आमदार तनपुरेंची भाऊबीज भेट

आहुरी ः आशा वर्कर, अंगणवाडीतील सेविका व बचत गटातील सीआरपी सेविका ह्या तालुक्यात समाज घडविण्याचे व समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचून त्यांच्या

कोरठणला रविवारी १९ डिसेंबरला मार्गशीष पौर्णिमा उत्सव
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करावी
अकोलेत डिझेलअभावी एसटीचे चाके थांबली

आहुरी ः आशा वर्कर, अंगणवाडीतील सेविका व बचत गटातील सीआरपी सेविका ह्या तालुक्यात समाज घडविण्याचे व समाजातील तळागाळातील घटकापर्यंत पोहचून त्यांच्या अडी अडचणी मार्गी लावण्याचे ह्या महिला करीत असतात त्यांना येणार्‍या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी त्यांचा भाऊ म्हणून निश्‍चित उभा असेल असा विश्‍वास माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी उपस्थित महिलांना दिला.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून व उत्कृष्ठ नियोजन तसेच माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्नेहपुंज मंगल कार्यालयात तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, व बचत गटातील सीआरपी सेविका ह्या शासनाच्या विविध योजना वाड्या वस्त्या पर्यंत पोहोचवण्याचे काम अविरतपणे करणार्‍या महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी योगदान अमूल्य आहे. आपल्यामुळे राहुरी तालुक्यातील तमाम मायबाप जनतेची सेवा घडत आहे. कोवीडच्या काळात आपण केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. आपल्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी व एक छोटीशी भेट भाऊबीजेच्या कार्यक्रम प्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, वैशाली टेके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा अपर्णा ढमाळ व कार्यक्रमाच्या संयोजक सोनालीताई तनपुरे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, भाऊबीज हा हिंदू धर्मा तील सण असून त्यातून भावा बहिणीचे नात्याचे दृष्टीने महत्वाचा सण आहे. लहानपणी सर्वत्र भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आम्ही सुद्धा बहीण भाऊ हा सण दहावी पर्यंत साजरा करीत असून पण दहावी नंतर माझी बहीण शिक्षणासाठी बाहेर पडली तरी सणाला दरवर्षी येत असे. पण तो 2001 सालापासून परदेशात गेल्याने हा सण आमचा साजरा होत नसल्याची खंत माझ्या मनात होती. माझी बहीण जरी अमेरिकेत असली तरी माझ्या तालुक्यातील ह्या भगिनी माझ्या पाठीशी असल्याने त्यांचेसाठी माझी पत्नी सोनाली तनपुरे हिच्या संकल्पनेतून व उत्कृष्ट नियोजनामुळे व माझी आई डॉ सौ उषाताई तनपुरे यांचे मार्गदर्शनातून हा भाव बंध कार्यक्रम होत आहे.मी 2019 ला आमदार झालो शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने राज्य मंत्री झालो. बचत गटातील सीआरपी सेविका ह्या समाजातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वपूर्ण काम करतात आज सर्वत्र बचत गटाची चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.बचत गटातील महिलांना देण्यात येणारे कर्ज हे 100 टक्के वसूल होत आहे. अश्या प्रकारचे कर्ज जर पुरुषांना दिले तर ते काहीच वसूल होणार नाही.बचत गटातील महिलांचे कार्य निश्‍चित समाजाला दिशा देणारे आहे. या तिन्ही वर्गातील महिलांच्या विविध प्रश्‍नावर मी त्यांचा भाऊ म्हणून निश्‍चित पाठीशी उभा राहील असा विश्‍वास प्राजक्त तनपुरे यांनी दिला. यावेळी आशा वर्कर गायत्री पवार,जयश्री वैरागर, ढोकणे खोसे, किरण सावंत आदिनी आमदार तनपुरे यांनी घेतल्या कार्यक्रमाचे व त्यांच्या कामाचे कौतुक केले.
भावबंध कार्यक्रम प्रसंगी काही महिलांनी प्रतिनिधीक स्वरूपात औक्षण केले.महिलांना सूत्रसंचालन करणारे आर जे प्रसन्न यांनी विविध कार्यक्रम, खेळ घेऊन महिलांना प्रोत्साहन दिले विजेत्या महिलांना सोनाली तनपुरे व उषाताई तनपुरे यांचे हस्ते बक्षीसे देण्यात आली. उपस्थित महिलांना भाऊबीज म्हणून सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, बचत गटातील सीआरपी सेविकांना यांना साडी भेट म्हणून देण्यात आली. व सर्वाना स्नेह भोजन देण्यात आले.

COMMENTS