Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार सरनाईकांची साडेसात कोटींची फसवणूक

ठाणे/प्रतिनिधी ः राज्यात फसवणूकीच्या घटनेत वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वीच अभिनेता विवेक ओबेरॉयची तब्बल 1.55 कोटींची फसवणूक करण्याचे प्रकरण ताज

हे नेते म्हणतायेत मला आहे केतकी चितळेचा अभिमान | LOKNews24
मुल होत नसल्याने दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल
राऊत यांनी मिठाचा खडा टाकू नये ; अजित पवार, नबाब मलिक यांची सडेतोड टीका

ठाणे/प्रतिनिधी ः राज्यात फसवणूकीच्या घटनेत वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वीच अभिनेता विवेक ओबेरॉयची तब्बल 1.55 कोटींची फसवणूक करण्याचे प्रकरण ताजे असतांनाच, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची एका व्यक्तीने तब्बल साडेसात कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडेही तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल 7 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हे प्रकरण 2021 चे आहे. प्रताप सरनाईक यांना घोडबंदर रोडवरील एका जमिनीचा व्यवहार करायचा होता. त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी मालाडमधील एका व्यक्तीला संपर्क साधला होता. मार्टीन बर्नार्डो, कोरिया असे या व्यक्तीचे नाव आहे. सरनाईक यांनी या व्यक्तीला या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी साडे तीन कोटी रुपये दिले. बँकेचा व्यवहारही झाला होता. मात्र, एवढी मोठी रक्कम मिळाल्यानंतरही त्या व्यक्तीने घोडबंदर रोडवरच्या जमिनीचे पेपर सरनाईक यांच्या नावावर केले नाहीत. सरनाईक यांना पैसेही दिले नाही. त्यामुळे सरनाईक चांगलेच वैतागले होते. पैसे मिळावेत किंवा जमीन आपल्या नावावर व्हावी म्हणून सरनाईक सातत्याने प्रयत्न करत होते. सरनाईक हे 2021 पासून सातत्याने जमिनीच्या व्यवहाराची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, संबंधित व्यक्तीकडून त्याची टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर सरनाईक यांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात जाऊन या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीने बँकेचे हप्ते भरले नाहीत म्हणून सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रारही केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये. आमदार प्रताप सरनाईक हे शिंदे गटातील महत्त्वाचे आमदार आहेत. यापूर्वी ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच शिवसेनेतून झाली. रिक्षा चालक ते आमदार हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ते बांधकाम व्यावसायिकही आहेत. तसेच ठाण्यातील एक बडं प्रस्थ म्हणून ओळखले जातात. त्यांच्यावर ईडीची धाड पडली होती. त्यांची ईडीकडून चौकशीही झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.

COMMENTS