Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीसाठी आमदार रोहित पवारांचे आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी ः कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोहित

आ. रोहित पवारांसमोरच दोन गटात हाणामारी (Video)
रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची विधीमंडळात चर्चा
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

अहमदनगर/प्रतिनिधी ः कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रोहित पवारांनी सोमवारी (24 जुलै) विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायर्‍यावर आंदोलन केले. याचे विधानसभेत पडसाद उमटले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी त्यांची समजूत काढत त्यांना आश्‍वासन दिल्यानंतर रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतले.
आमदार अनिल देशमुख यांनी रोहित पवार हे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायर्‍यांवर आंदोलन करत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. विधानसभेत बोलताना आमदार देशमुख म्हणाले, रोहित पवार बाहेर पावसात त्यांच्या जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसीची मागणी केली होती. मागच्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली होती. त्या मागणीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले होते की, अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दल आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं, तरी त्याचे आदेश निघालेले नाहीत. त्यासाठी ते उपोषण करताहेत आणि शासनाने याची दखल घ्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवारांनी आंदोलन मागे घेतले. रोहित पवारांची भेट घेतल्यानतर माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, रोहित पवार यांनीत्यांच्या मतदारसंघात एमआयडीसी साठी आंदोलन सुरू केले होते, राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार उद्याच उद्योग विभागाकडून कर्जतमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी बैठक घेतली जाईल, असे आश्‍वासन दिलं आहे. यासाठी जी अधिसूचना काढावी यासाठी उद्योग विभाग सकारात्मक आहे. रोहित पवारांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे. सरकार एमआयडीसाठी सकारात्मक अधिसूचना लवकरात लवकर काढली जाईल आणि त्यासाठी उद्या बैठक घेतली जाईल असे उदय सामंत म्हणाले.

COMMENTS