Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रोहित पवारांना पुन्हा धक्का !

सिद्धटेकमधील 9 ग्रामपंचायत सदस्य आ. राम शिंदे यांच्या गोटात

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून कर्जत- जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवारांना नवनवीन राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. आता सिद्ध

केवळ जाहिरातबाजीसाठी पर्यावरण दिन नको
खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
महसूल प्रशासनाकडून डिजीटल सात बाराचे घरपोच वाटप

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून कर्जत- जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. रोहित पवारांना नवनवीन राजकीय धक्के बसताना दिसत आहेत. आता सिद्धटेकमध्येही मोठा राजकीय भूकंप झाला आहे. सिद्धटेक ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी राष्ट्रवादीच्या उपसरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर ( 9 विरुद्ध 1 ) झाला आहे. यामुळे सिद्धटेक ग्रामपंचायतमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली आहे. सिद्धटेकमधील 9 सदस्यांनी आ. प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली आहे.
सिद्धटेक येथील या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्जत तालुक्यात मोठे भगदाड पडले आहे. तालुक्यातील सर्वात महत्वपूर्ण असलेल्या सिद्धटेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता होती. येथील सरपंचपद रिक्त असल्याने राष्ट्रवादी समर्थक अमोल भोसले हे उपसरपंच म्हणून गावचा कारभार पाहत होते. उपसरपंच भोसले यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सिद्धटेकमधील 9 सदस्यांनी बंड पुकारत अविश्‍वास ठराव दाखल केला होता. अविश्‍वास ठरावासाठी गावातील पारंपरिक विरोधक असलेले भाजप व राष्ट्रवादीचे ग्रामपंचायत सदस्य पहिल्यांदाच एकत्र आले. या सर्वांनी एकत्रित येत उपसरपंच अमोल भोसले यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने जिंकत राष्ट्रवादीच्या सत्तेला मोठा सुरूंग लावला. सिद्धटेक हे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. सिध्दटेकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आ. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, हीच गोष्ट हेरून सिद्धटेक ग्रामपंचायतच्या 9 सदस्यांनी 1 डिसेंबर रोजी आ. प्रा. राम शिंदे यांची चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सर्व सदस्यांनी आ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रमेश विठ्ठल पवार, लता सोमनाथ सांगळे, वामनराव मोरे, सखाराम महादेव तांदळे, शोभाबाई नागनाथ जाधव, रेश्मा अमित खोमणे, उज्वला मच्छिंद्र बनकर, अभिजीत मांढरे हे ग्रामपंचायत सदस्य तसेच सारंग रोहिदास नलगे, चिंतामण सांगळे, सचिन बनकर, बंडाभाऊ मोरे, तुकाराम लष्कर व आदी उपस्थित होते. या सर्वांचे आ. शिंदे यांनी स्वागत केले. ग्रामपंचायतमध्ये विकासाचे राजकारण करा. सिद्धटेकच्या विकासासाठी सर्व विकासकामे मार्गी लावू असा शब्द त्यांनी दिला. चोंडी येथे ग्रामपंचायत सदस्यांचा आ. प्रा. राम शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे व मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS