मुंबई प्रतिनिधी - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतांनाच, शिवसेनेचे लांजा-रा
मुंबई प्रतिनिधी – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतांनाच, शिवसेनेचे लांजा-राजापूरचे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी हे लवकरच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सरकारमध्ये नगरविकास खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र या सर्व चर्चांवर स्वत: ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी आपली भूमिका मांडली आहे. मला कॅबिनेट काय मुख्यमंत्री पद दिले तरी शिंदे गटात जाणार नसल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले.
विकासकामांसाठी मंत्रिमहोदयांना भेटावे लागते. रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्योगमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला मी गेलो होतो. जनतेच्या पाच प्रमुख मागण्या आहे, त्या बैठकीत मांडल्या. त्या मागण्या पू्र्ण झाल्यास प्रकल्पाला पाठिंबा देण्याची आमची भूमिका आहे. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी राजन साळवी यांचे कौतुक केले होते. त्यानंतर साळवी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनी जोर धरला असून, हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS