Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधानांना पाठवलं पोस्टकार्ड

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याबाबत विचारला जाब

सोलापूर प्रतिनिधी -  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्र

ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यास मान्यता
बालकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त : मंत्री आदिती तटकरे
भिंगार अर्बन बँकेच्यावतीने युपीआय क्युआर कोड व मोबाईल बँकिंगचा शुभारंभ

सोलापूर प्रतिनिधी –  राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याबाबतीत जाब विचारण्यासाठी पोस्टकार्ड पाठवलं आहे. सोलापुरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफिस मधून हे पोस्टकार्ड पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्गांवरील पत्त्यावर हे पोस्टकार्ड पाठवण्यात आलं आहे. येत्या महिनाभरात 5 ते 10 हजार पोस्टकार्ड मोदींना पाठवणार असल्याचा निर्धार युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

COMMENTS