Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार पद भांडणं लावण्यासाठी नसते : निशिकांत भोसले-पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : गोरगरिबांची सेवा करणे हे आमदारांचे काम असते. आपले आमदार पद घरा-घरात, जाती-जातीत भांडणं लावण्यासाठी नसते. आमदार हा दुसर्

वारकर्‍याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार पलटी; दाम्पत्याचा जागीच अंत
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 95 टक्के मतदान
रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार पुन्हा बिनविरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : गोरगरिबांची सेवा करणे हे आमदारांचे काम असते. आपले आमदार पद घरा-घरात, जाती-जातीत भांडणं लावण्यासाठी नसते. आमदार हा दुसर्‍याच्या चुली विझविण्यासाठी नसतो तर चुली पेटविण्यासाठी असतो, अशा शब्दांत इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निशिकांत प्रकाश भोसले-पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील कवठेपिरान व गोटखिंडी येथे प्रचार सभे दरम्यान ते बोलत होते. यावेळी गौरव नायकवडी, राहुल महाडिक, पै. भीमराव माने, प्रसाद पाटील, भगवानराव पाटील, महादेव घारे प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेल्या 35 वर्षात दूध, ऊस उत्पादकांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत. या जिल्ह्यातील अनेक कारखानदारांना 3500 रुपयांहून अधिक ऊसदर देण्याची इच्छा असून ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न कोण करते ते जिल्ह्यातील जनतेला माहीत आहे. त्या प्रवृत्तीचा आता हिशोब करण्याची वेळ आली आहे. माळेगावचा सहकारी साखर कारखाना 3636 तर सोमेश्‍वरसारखा साखर कारखाना 3 हजार 500 रुपयांपेक्षा जास्त दर देतो. इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून मिरवणार्‍यांना का जमत नाही. राजकारणाचा सुसंस्कृतपणा कसा असावा हे या सांगली जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राला शिकवले. काँग्रेस पक्षाचे तिकीट वाटप या जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील करत होते. परंतू त्यांच्या नातवाची तिकिटासाठी एकदा न्हवे दोनदा तुम्ही परवड करत असाल तर तुम्ही विचार करण्याची वेळ आहे.
भीमराव माने म्हणाले, जयंत पाटील यांचे राजकारण हे समाजहिताचे नसून स्वहित व नातेवाईक यांच्या हिताचे आहे. 35 वर्षे ज्या जनतेने त्यांना हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्या जनतेची जाणीव त्यांना नाही. ही निवडणूक ऐतिहासीक होणार आहे. परिवर्तन निश्‍चित आहे. तुम्ही कोणाच्या दबावाला,अमिषाला बळी पडू नका, हे आमदार महाशय एवढी वेळ संधी द्या म्हणून येतील. त्यांच्या आमिषाला भुलायचं नाही. निशिकांतदादासारखा आपल्या घरातील वाटणारा, हक्काचा माणसाला साथ द्या.
राहुल महाडिक म्हणाले, आजपर्यंत तुम्ही लय सोसलय, आता सोसायचं नाय. ऊस बिलातून तुमचे कोट्यवधी रुपये लुटणार्‍याला या निवडणुकीत खर्‍या अर्थाने धडा शिकवा व निशिकांतदादांसारखा स्वाभिमानी आमदार आपले प्रश्‍न सोडविण्यासाठी विधानसभेत पाठवा.

COMMENTS