आमदार नितेश राणेंना सशर्त जामीन मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार नितेश राणेंना सशर्त जामीन मंजूर

सिंधुदुर्ग : गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप नेते आणि आमदार नितेश (Nitesh Rane Got bail) राणे यांना अखेर कोर्टानं जामीन मंजूर के

कर्मवीर व लक्ष्मी वहिनींचा प्रवास परंपरेकडून आधुनिकतेकडे ः डॉ. प्रकाश पवार
मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड : पंतप्रधान मोदी
एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी पै. धनश्री फंडची निवड

सिंधुदुर्ग : गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन कोठडीत असलेले भाजप नेते आणि आमदार नितेश (Nitesh Rane Got bail) राणे यांना अखेर कोर्टानं जामीन मंजूर केलाय. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणेंची (Nitesh Rane Health) तब्येतही खालवली आहे. आज सकाळी तर त्यांना उलट्याचा त्रास होत असल्याचीही माहिती आली होती. त्यापार्श्वभूमीवर नितेश राणेंसाठी आणि एकूणच राणे कुटुंबियांसाठी (Narayan Rane) हा मोठा दिलासा मानला जातोय. नितेश राणे यांना संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि शेवटी ते सेशन्स कोर्टापर्यंत आलं. अनेक राजकीय तसच कोर्टातल्या घडामोडीनंतर नितेश राणेंना जामीन मंजूर केला.

COMMENTS