Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सोनहिरा’ च्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम बिनविरोध

कडेगाव / प्रतिनिधी : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम यांची तर उपाध्यक्षपदी पंढरीनाथ घाडगे यांची बि

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा
खास एफसी या ५ बटाटा वाणाचे पेटंट रद्द | LOKNews24
जिहे कठापूरचा समावेश पीएमकेएसवायमध्ये व्हावा; आ. जयकुमार गोरे यांची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी

कडेगाव / प्रतिनिधी : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम यांची तर उपाध्यक्षपदी पंढरीनाथ घाडगे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गणेश मरकड यांनी काम पाहिले.
नुकतीच सोनहिरा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. प्रांताधिकारी मरकड यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नूतन संचालकांची बैठक पार पडली.
संचालक पुरुषोत्तम शिवाजीराव भोसले यांनी आमदार कदम यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले. संचालक पोपटराव महिंद यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी घाडगे यांचे नाव युवराज कदम यांनी सुचवले. तानाजी शिंदे यांनी अनुमोदन दिले.
निवडीनंतर सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्याहस्ते कारखान्याच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. कदम म्हणाले, (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांनी कारखान्याच्या अनुषंगाने ठरवून दिलेल्या परंपरेनुसार व मार्गदर्शनानुसार, कुशल प्रशासनाव्दारे कारखान्याची सदैव प्रगतीच्या दिशेनेच वाटचाल सुरू आहे. तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. प्रभाकर जाधव यांनी स्वागत केले. युवराज कदम यांनी आभार मानले.

COMMENTS