Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जयंत पाटील यांनी आडवे पडायचे काम केले : आ. सदाभाऊ खोत

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटलांना 35 वर्षात इस्लामपूर एमआयडीसीमध्ये एखादा मोठा नवीन उद्योग आणून तरुणांना रोजगार देता आला नाही. त्यांनी फ

सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या
मुस्लिम समाजाच्या वतीने ऐक्याचा संदेश देणारी पवित्र रमजान ईद साजरी
सडा वाघापूरजवळ अल्टो कार तीनशे फूट दरीत कोसळली : एकजण जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : आ. जयंत पाटलांना 35 वर्षात इस्लामपूर एमआयडीसीमध्ये एखादा मोठा नवीन उद्योग आणून तरुणांना रोजगार देता आला नाही. त्यांनी फक्त आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत आडवे पडायचे काम केले. ते आण्णासाहेब डांगे, स्व. एन. डी. पाटील यांच्या होणार्‍या कारखान्यांना आडवे पडले. स्व. संभाजी पवार यांनी काढलेला कारखाना त्यांनी हाणला, अशी जहरी टीका आ. सदाभाऊ खोत यांनी केली.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ बहे येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पृथ्वीराज पवार, गौरव नायकवडी, प्रसाद पाटील, निवास पाटील, केदार पाटील, सागर मलगुंडे, लालासाहेब पाटील, शहाजी पाटील, मधुकर हुबाले, यदुराज थोरात, गणेश शेवाळे प्रमुख उपस्थित होते.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, मी तीन वर्षे मंत्री होतो. जनतेने मला जे मागितलं ते मी त्यांना दिलं. परंतु मला पुस्तक कधी काढायची वेळ आली नाही. तुम्ही जनतेचा विकास खर्‍या अर्थाने केला असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती. माणूस उभा करण्याचे काम महायुती सरकारने केले आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले. दुसरीकडे विरोधक म्हणतात ते सत्तेवर महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना बंद करणार.
पृथ्वीराज पवार म्हणाले, आप्पा मला म्हणाले, मी ज्याला घरचा मुलगा म्हणून राजकारणात आणलं, त्यांनी केसाने गळा कापला. त्यामुळे मी लढणार आणि सर्वोदय कारखाना सभासदांच्या मालकीचा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. या विश्‍वास घातकी प्रवृत्तीचा बिमोड करण्याची हिच योग्य संधी आली आहे. त्यामुळे आपल्या आई-बहिणीची काळजी घेणार्‍या निशिकांतदादांना आपण सर्वांनी निवडून द्यायच आहे. एवढेच मी यानिमित्त तुम्हाला आवाहन करतो.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, विरोधकांनी निवडणुकीच्या तोंडावर कुठलीतरी माहिती पुस्तिका काढली. पण त्यांनी घरोघरी पोहच केलेल्या पुस्तिकावर खर्च करण्यापेक्षा दिवाळीत त्यांच्या साखर कारखान्याला ऊस घालणार्‍या ऊस उत्पादकाला 100 रुपयांचा बिलाचा हप्ता दिला असता तर दिवाळी चांगली झाली असती.

COMMENTS