हिसार ः हरियाणातील प्रसिद्ध एअर होस्टेस गीतिका आत्महत्येप्रकरणी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी आमदार गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्

हिसार ः हरियाणातील प्रसिद्ध एअर होस्टेस गीतिका आत्महत्येप्रकरणी दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी आमदार गोपाल कांडा यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात गोपाल कांडा हे मुख्य आरोपी होते. कांडा हे हरियाणाचे गृह राज्यमंत्री राहिले आहेत. याप्रकरणी त्यांनी 18 महिने तुरुंगातही काढले आहेत. 11 वर्षांनंतर आलेल्या या निर्णयावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हात जोडून काहीही बोलायचे नाही असे सांगितले. या निर्णयावर गोपाल कांडा यांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते. जर त्यांना दोषी ठरवले गेले तर त्यांचे आमदारपद गमवावे लागले असते.
COMMENTS