Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार गायकवाडांच्या वाहन चालकाला अटक

मुंबई ः भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आमदाराचा वाहनचालक रणजीत यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत यादव गणपत गायकवाड यांच

मनोज जरांगे पाटील : इव्हेंट मॅनेजमेंट की सत्ता संघर्ष ?
नाशिकच्या नामवंत मेडिकल कॉलेजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू
निर्भया पथकाच्या वाहनावर दगडफेक

मुंबई ः भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात पोलिसांनी आमदाराचा वाहनचालक रणजीत यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत यादव गणपत गायकवाड यांचा वाहन चालक आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतले आहे.
सदर प्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील फरार आहे. पोलिस आमदारांच्या मुलाचाही शोध घेत आहेत. गणपत गायकवाड यांचा चालक रणजीत यादवला उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. उल्हासनगर न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. उल्हासनगर हिललाईन पोलिस ठाण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. सध्या ते कळवा पोलिस ठाण्यात अटकेत आहेत. अशात गेल्या 3 दिवसांपासून ते जेवत नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. घडलेल्या प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांनी अन्न त्याग केला आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून त्यांचे समुपदेशन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली होती. आता वाहन चालकाला अटक केल्याने ही संख्या 7 वर पोहचली आहे.

COMMENTS