Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार आशुतोष काळेंनी भाविकांना केले फराळ वाटप

कोपरगाव : पुणतांबा येथे कामिका एकादशी निमित्त आलेल्या वारकर्‍यांना व भाविकांना आ. आशुतोष काळे यांनी फराळ वाटपाची सेवा करून श्री योगीराज चांगदेव म

केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे
धारणगाव, कुंभारीच्या मुस्लिम दफनभूमीचा प्रश्‍न मार्गी
अपयशातून यशाचा मार्ग तयार करा ः आमदार आशुतोष काळे

कोपरगाव : पुणतांबा येथे कामिका एकादशी निमित्त आलेल्या वारकर्‍यांना व भाविकांना आ. आशुतोष काळे यांनी फराळ वाटपाची सेवा करून श्री योगीराज चांगदेव महाराज यांच्या समाधीचे पूजन करून मनोभावे दर्शन घेतले.
आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूमाऊलीचे दर्शन घेतल्यानंतर दक्षिण काशी समजल्या जाणार्‍या श्री क्षेत्र पुणतांबा या ठिकाणी श्री योगीराज चांगदेव महाराज यांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी कामिका एकादशीला पुणतांबा येथे मोठी यात्रा भरते. या कामिका एकादशीला पुणतांबा परिसरासह  पंचक्रोशीतील भाविक व जिल्ह्यातील वारकर्‍यांची दर्शनासाठी लाखोंची गर्दी असते. याहीवर्षी पुणतांबा परिसरासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेनिमित्त दरवर्षी सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प. रामगिरीजी महाराज याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. पावणे दोनशे वर्षाची परंपरा असलेल्या श्री सदगुरु गंगागिरिजी महाराज यांच्या सप्ताहाची औपचारिक घोषणा देखील कामिका एकादशीला करण्याची मागील 150 वर्षाची परंपरा असून ही घोषणा दरवर्षी ह.भ.प.प.पू. रामगिरीजी महाराज करतात त्यामुळे या यात्रेला विशेष महत्व आहे. आमदार आशुतोष काळे यांनी योगीराज चांगदेव महाराज यांचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळ वाटप केले. गोदातीरी असलेल्या अनेक मंदिरातील देवदेवतांचे मनोभावे दर्शन घेतले. ह.भ.प. रामगिरीजी महाराज यांचे पूजन करून त्यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेतला तसेच मुक्ताई ध्यानपीठाचे ह.भ.प. प.पू.श्री रामानंदगिरीजी महाराज यांचे देखील आशीर्वाद घेतले. यावेळी चांगदेवनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला भेट देवून समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल सर्व आयोजकांचे कौतुक केले.   

COMMENTS