मुंबई ः समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी समन्स बजाविल्याने अबू आझमी यांना आता चौकशीसाठी हजर रहावे

मुंबई ः समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी समन्स बजाविल्याने अबू आझमी यांना आता चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. येत्या 20 एप्रिल रोजी त्यांची वाराणसीतील विनायक ग्रुपमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी होणार आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यात काही नेत्यांना अगदी कारागृहातदेखील जावे लागले होते, यामुळे आता अबू आझमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS