केडगाव येथून तरुणी बेपत्ता

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव येथून तरुणी बेपत्ता

अहमदनगर/प्रतिनिधी : घरात कोणाला काहीएक न सांगता 19 वर्षीय तरुणी घराबाहेर गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील वेशीजव

प्राचार्याच्या मुलीसाठी फोडला प्रात्याक्षिकाचा पेपर
राजकीय सूड उगवण्यासाठी 30 कोटी केले शासनाला परत
नवरात्रोत्सवानिमित्त समता स्कूच्या सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर/प्रतिनिधी : घरात कोणाला काहीएक न सांगता 19 वर्षीय तरुणी घराबाहेर गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील वेशीजवळ शुक्रवारी (दि.21) सकाळी घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाणे येथे निलेश फंड (राहणार शिक्रापूर, पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी हरवल्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार बी एम इखे करीत आहे.
हरवलेल्या तरुणीचे वर्णन असे- नाव प्रतीक्षा, रंग गोरा, उंची 5 फूट 3 इंच, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे लांब, नाक सरळ, दात शाबूत, नेसणीस लाल रंगाचा पंजाबी ड्रेस, पायात चप्पल, जवळ इंटेल कंपनीचा साधा फोन आहे. या वर्णनाच्या तरुणीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे (फोन नंबर 0241- 2416117) वा पोलिस हवालदार बी. एम. इखे (मोबाईल नंबर 9923600605) या फोनवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

COMMENTS