Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत ’महसूल’चा भोंगळ कारभार ?

महसूल विभागाच्या गलथानपणाचे नमूने येत आहे समोर

कर्जत : कर्जतच्या महसूल विभागाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस अधिकाधिक आता उघड होऊ लागला आहे. रक्षकच भक्षक होऊ लागल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वाताव

आगामी निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार: दीपक निकाळजे
नगर तालुक्यातील पाच गावांतून लॉजिस्टिक पार्क करण्याची मागणी
पोलीस इलेव्हन शिरूर ठरले कर्जतच्या पैलवान चषकाचे मानकरी

कर्जत : कर्जतच्या महसूल विभागाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस अधिकाधिक आता उघड होऊ लागला आहे. रक्षकच भक्षक होऊ लागल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतकर्‍यांचे महसूल विभागातील कामे करून घेण्यासाठी शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या तलाठ्याचे प्रकरण ताजे असतानाच महसूल विभागाच्या गलथान कारभाराचे नवनवीन प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
असेच एक प्रकरण समोर आले आहे.कोंभळी येथील शेतकरी नवनाथ रामभाऊ गांगर्डे हे त्यांच्याच पडीक जमिनीची सुधारणा करण्यासाठी मुरूम उचलत होते. फळबाग लागवड करण्यासाठी त्यांच्याकडून शेतातील कामे केली जात असतानाच, महसूल विभागाने तेथील जेसीबी मशीन व ट्रॅक्टर ही वाहने कर्जत तहसीलमध्ये कारवाईसाठी आणली. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून ही कारवाई होत असल्याचा आरोप काकासाहेब तापकीर, शेखर खरमरे यांच्यासह शेतकर्‍यांनी केला. शेतकर्‍यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे विनापरवाना शेतकर्‍यांच्या शेतातील शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन झाले. त्याची लेखी तक्रार कर्जतच्या महसूल विभागाकडे देऊनही पंचनामा व दंडात्मक कारवाई करण्याची तसदी महसूल विभाग घेताना दिसत नाही. निमगाव डाकू तसेच कुळधरण येथील शेतकर्‍यांच्या शेतातील मुरमाचे उत्खनन करून मोठे नुकसान झालेले आहे. मात्र न्यायासाठी  आता या शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चाललेली दिसत आहे.
नव्याने दाखल झालेले तहसीलदार गणेश जगदाळे यांचे कर्मचार्‍यावर कसलेच नियंत्रण राहिले नसल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आहे. सरकारकडून ’शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवला जात असताना कर्जतचे महसूल प्रशासन मात्र शेतकर्‍यांना असंवेदनशीलतेने वागवत आहे. महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कामात दिरंगाई झाल्याचा ठपका ठेवून काही महिन्यांपूर्वीच कर्जत येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे निलंबन झाले होते. त्यांच्या जागी नव्याने दाखल झालेल्या अधिकार्‍यांवर मोठी जबाबदारी आहे. मात्र शेतकर्‍यांना न्याय मिळवण्यासाठी कर्जत महसूल कार्यालयासमोर येऊन निदर्शने,आंदोलने,उपोषण करावी लागत आहेत. महसूल मंत्र्यांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन अधिकार्‍यांवर कारवाई करावी. अशी शेतकर्‍यांकडून मागणी होत आहे.

COMMENTS