Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खर्ड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जामखेड : खर्डा येथील अल्पवयीन मुलीवर धाक दाखवून आत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सचिन दिलीप काळे रा खर्डा ता जामखेड याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनमध्ये

प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण
गणेश मुद्दमेने साकारली पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती
मुक्रमाबाद येथे काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

जामखेड : खर्डा येथील अल्पवयीन मुलीवर धाक दाखवून आत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सचिन दिलीप काळे रा खर्डा ता जामखेड याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नंबर व कलम 166 /2024 भारतीय न्याय संहिता कलम 64, 64 (2) (ा) 351,(2) 351, (3) पोस्को अंतर्गत 4,6, सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची सदर अल्पवयीन पीडित मुलीची आजी शारदा काळे वय 60 (नाव बदलले आहे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 14 वर्षे 7 महिने वय असलेल्या पिडीतेवर आरोपी सचिन दिलीप काळे (वय 19) याने 7ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तसेच तारीख आठवत नाही रात्री 8वाजे सुमारास फिर्यादीच्या घरासमोरील रोडच्या शेजारी टाकीजवळ आरोपीने धमकी देऊन तिच्यासोबत अंधारामध्ये घेऊन जाऊन बळजबरीने शारीरिक संबंध केले. तसेच यापूर्वी त्याने घरासमोरील टाकीजवळ बळजबरीने अत्याचार व शारीरिक संबंध धाक दाखवून निर्माण केले होते. फीर्यादी नुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या संदर्भात तपासाची चक्रे फिरवून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस कर्मचार्‍यांनी आरोपी सचिन काळे यास 24 तासाच्या आत अटक केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे हे करीत आहेत.

COMMENTS