अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस आमीष दाखवून केले अपहरण

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथून 3 नोव्हेंबर 2021 रोजी ढवळगाव येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून क

नाटेगावच्या सरपंच, ग्रामसेवकांच्या दंडाचा आदेश रद्द करा
मराठी भाषा सर्व विद्याशाखेत बारावीपर्यंत सक्तीची ः प्रा. डिसले
बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथून 3 नोव्हेंबर 2021 रोजी ढवळगाव येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने राहत्या घरातून कशाचे तरी आमीष दाखवून पळवून नेले. या प्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात 4 नोव्हेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवूनही मागील चार महिन्यांपासून तिचा तपास लागत नसल्याने या गुन्ह्यातील पीडित मुलीबाबत कोणास काही महिती असल्यास बेलवंडी पोलिस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केले आहे. या मुलीची माहिती मिळाल्यास बेलवंडी पोलिस स्टेशन फोन नं 02487-250233 पोलिस निरीक्षक एन. व्ही. दुधाळ 9423583955 वा पोलिस उपनिरीक्षक आर. यू. चाटे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS