Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कामाचे मूल्यांकन करूनच मंत्रिपदे देणार : फडणवीस

मुंबई : हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सर्व मंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रि

मुंबईत ‘ईडी’चे छापे ; एका मंत्र्याचीही चौकशी
सायन येथील निवासी डॉक्टरांचा मृत्यू
जी-20 परिषदेसाठी गोव्यात जोरदार तयारी सुरू  

मुंबई : हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सर्व मंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदे द्यायची असल्याने काही प्रमाणात मागे पुढे होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज शनिवारी महायुतीच्या नेत्यांची बैठक असल्याचेही समोर आले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून यामध्ये 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्‍चित झाल्याचे सूत्रांची माहिती आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेकडून मंत्रिपद देताना कठोर निकष लावणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे कठोर निकष लावून मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आले आहे. पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय?, याचा विचार मंत्रिपद देताना केला जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचारसुद्धा केला जाणार आहे. तसेच ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिले जाणार नाही, अशीही माहिती समोर आली आहे. तर यंदाच्या मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या तीन विद्यामान मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे. सूत्रांच्या माहितीनूसार यामध्ये दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS