लोणी ः प्रवरा परिसरांतील दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसांने परिसरांतील अनेक शेतकर्यांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
लोणी ः प्रवरा परिसरांतील दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी पावसांने परिसरांतील अनेक शेतकर्यांच्या गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या नुकसान ग्रस्त भागाची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी करत शेतकर्यांना शासनाच्यावतीने मदत करतांनात नुकसानग्रस्त शेतक-याचे पंचनामे करुन तातडीच मद्दत लवकर देण्याच्या सुचना केल्या. दाढ बुद्रुक येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळामध्ये मच्छींद्र काशीनाथ तांबे यांची दुभती गाय, गायांच्या गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुनील दाभाडे यांच्या घरावर झाड पडून घरांचे मोठे आणि गाईच्या गोठ्यासह चार गाई जखमी झाल्या संतोष गाडेकर आणि सुनिल गाडेकर यांचे ही या वादळामध्ये मोठे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग जास्त असल्याने दाढमध्ये अनेक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बरोबरचं चारा पिकांसह फळबागेचे नुकसान झाले. मंञी विखे पाटील यांनी या भागातील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन शासनाच्यावतीने शेतकर्यांना दिलासा देऊन अधिकार्यांनी सर्वाचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.यामध्ये 38 जणांच पंचनामे करण्यात आले असून राहीलेले पंचनामे त्वरीत करण्याच्यि सुचना त्यांनी देतांना वीज पुरवठा आणि नुकसानीची माहीती घेऊन शेतक-यांना जास्तीत डास्त मद्दत करा असे अधिका-याना सांगितले. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक सुनिल तांबे, माजी संचालक प्रताप तांबे, अशोक गाडेकर,सरपंच तात्यासाहेब सातपुते, उपसरपंच नकुल तांबे, गोरक्षनाथ तांबे, योगेश तांबे सुनिल तांबे, भास्कर तांबे, गोकुळ गाडेकर, नायब तहसिलदार हेमंत पाटील.तलाठी विठ्ठल कानडे, मंडळ अधिकारी रमेश झेंडे, पशुवेद्यकीय अधिकारी डॉ. सतीष शिरसाठ आदी उपस्थित होते.
COMMENTS