Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री गावितांची मुलगी शेतकरी योजनेची लाभार्थी

केंद्राकडून 10 कोटींचे अनुदान लाटल्याचा वि जय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांची मुलगीच किसान संपदा योजनेची लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप

मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार ?
महालक्ष्मी’ हॉस्पिटलमधील आयसीयु सेंटरने मिळणार जीवदान : डॉ.तोरडमल
कोल्हापूरमध्ये दुचाकीचा भीषण अपघात.

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते विजयकुमार गावित यांची मुलगीच किसान संपदा योजनेची लाभार्थी असल्याचा गंभीर आरोप  विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे गावित यांच्या कन्येने या योजनेअंतर्गत केंदाचे 10 कोटीचे अनुदान लाटल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. यामध्ये ही मुख्य लाभार्थी आहे. विजयकुमार गावित यांची मुलगी सुप्रिया गावित यांच्या मुलीच्या कंपनीला केंद्र सरकारकडून योजने अंतर्गत दहा कोटी रुपयांचे अनुदानही मिळाले आहे, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी किसान संपदा योजनेच्या लाभार्थ्यांची यादीही ट्विट केली आहे. त्याचा हवाला देत विजय वडेट्टीवार यांनी दावा केला आहे की, सुप्रिया गावित यांच्या रेवा तापी औद्योगिक विकास कंपनीला दहा कोटीची सबसिडी मिळाली. एवढेच नव्हे तर भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे. यादी ट्विट करत वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, किसान संपदा योजना शेतकर्‍यांची आहे. लाभार्थी यादी मात्र भाजप मंत्र्यांची आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ही योजना आहे. योजनेचा लाभ मात्र भाजप नेते घेत आहे. योजनेमुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न तर वाढले नाही, भाजपमध्ये भरती झालेल्या नेत्यांचे उत्पन्न कोटींनी वाढले हे मात्र खरे आहे. वडेट्टीवार म्हणाले, जिथे लाभ तिथे भाजप परिवार. वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का? ना खाऊंगा ना खाने दुंगाचा ढोल वाजवत मते घेणार्‍या सरकारने जनतेसाठी काम करायचे असते, भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही, 2023 मध्ये मोदी सरकारचा नारा बदलून तुम भी खाओ मैं भी खाऊंगा असे झाले काय? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

COMMENTS